मुख्य बातमी
तिरुपती–साईनगर शिर्डी नवीन साप्ताहिक रेल्वेला मंजुरी
मुख्य बातमी | 15 Dec 2025
राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून तिरुपती–साईनगर शिर्डी–तिरुपती या नवीन साप्ताहिक रेल्वेला रेल्वे मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे. येवला व परिसरातील नागरिकांना तिरुपती व शिर्डी या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या नवीन रेल्वेची सुविधा उपलब्ध होणार आहे
भोपाळ ते पुणे हॉट एअर बलूनिंग मोहिमेने रचला नवा विक्रम
मुख्य बातमी | 15 Dec 2025
भारतीय लष्कराच्या भोपाळ ते पुणे या हॉट एअर बलूनिंग मोहिमेचे आज पुण्यात हिरवा झेंडा दाखवून स्वागत करण्यात आले. भोपाळमधील ईएमई सेंटर येथील हॉट एअर बलूनिंग नोडने भारतीय लष्कराच्या साहसी विंगच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या या मोहिमेला 30 नोव्हेंबर 2025 रोजी हिरवा झेंडा दाखवण्यात आला.