NTA सह सार्वजनिक परीक्षांमध्ये होणार मोठे बदल... पेपरफुटी रोखण्यासह पारदर्शकतेसाठी...

Share:
Main Image
Last updated: 30-Aug-2026

अक्षय काळे, (मुंबई) ३० ऑगस्ट - नॅशनल टेस्टिंग एजन्सीसह (NTA) देशातील सर्व सार्वजनिक परीक्षा अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि भविष्यासाठी सज्ज करण्यासाठी भारत सरकारने नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली उच्च-स्तरीय कृती दलाची (High-Level Task Force) स्थापना केली आहे. या कृती दलाने परीक्षा पद्धतीत व्यापक सुधारणा सुचवण्यासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि तज्ज्ञांकडून ऑनलाईन व ऑफलाईन माध्यमातून सूचना मागवल्या आहेत.

विद्यार्थ्यांचे हित जपून परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालणे आणि संगणक-आधारित चाचण्या सुरक्षित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या १० प्रमुख क्षेत्रांवर मागवल्या सूचना:

१. परीक्षा आयोजन व सुरक्षा: पेपरफुटी व गैरप्रकार रोखण्यासाठी उपाय.

२. प्रारुप व मूल्यमापन: परीक्षा पद्धत व गुणदान प्रक्रियेत सुधारणा.

३. प्रशासन व उत्तरदायित्व: संस्थात्मक जबाबदारी निश्चित करणे.

४. तक्रार निवारण व पारदर्शकता: विद्यार्थ्यांचे प्रश्न वेळेत सोडवणे.

५. तंत्रज्ञानाचा वापर: सुरक्षित आणि अत्याधुनिक कॉम्प्युटर-बेस्ड टेस्ट (CBT).

६. पायाभूत सुविधा: परीक्षा केंद्रांचा दर्जा व विस्तार सुधारणे.

Advertisement

७. सर्वसमावेशकता: भाषिक, प्रादेशिक आणि सामाजिक अडथळे दूर करणे.

८. परीक्षेतील घोटाळ्यांचा प्रतिबंध: हाय-टेक गैरप्रकार शोधणे.

९. विद्यार्थ्यांचे हित: मानसिक ताण कमी करणे व न्याय्य संधी देणे.

१०. इतर नावीन्यपूर्ण उपाय.

सूचना कशा आणि कुठे सादर करायच्या?

नागरिक, विद्यार्थी व तज्ज्ञ १३ सप्टेंबर २०२६ पर्यंत इंग्रजी, हिंदी किंवा कोणत्याही प्रादेशिक भाषेत (मराठीसह) आपल्या सूचना खालील माध्यमांद्वारे पाठवू शकतात:

वेबसाईट: examreforms-taskforce.dopt.gov.in

ई-मेल: ExamReformsTaskforce@dopt.gov.in

व्हॉट्सॲप: +917827042830 या क्रमांकावर hptf लिहून मेसेज पाठवा.

टोल-फ्री नंबर: 1800-180-4747

Comments

No comments yet.