राज्यात इतक्या दिवसांचा दुखवटा जाहीर... या कार्यालयांना सुटी...

Share:
Main Image
Last updated: 28-Jan-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २८ जानेवारी -  महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे नेतृत्व, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित (आशाताई अनंतराव) पवार यांचे आज, २८ जानेवारी २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असून, प्रशासकीय वर्तुळातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर
राज्य सरकारने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे २८ ते ३० जानेवारी २०२६ असे तीन दिवस राज्यात अधिकृत दुखवटा जाहीर केला आहे. या कालावधीत:
राज्यातील ज्या इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकवला जातो, त्या सर्व ठिकाणी ध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येईल.
या तीन दिवसांच्या काळात सरकारतर्फे कोणतेही शासकीय मनोरंजन कार्यक्रम आयोजित केले जाणार नाहीत.

Advertisement

आज शासकीय कार्यालयांना सुटी
उपमुख्यमंत्र्यांच्या निधनामुळे आदरांजली म्हणून आज, बुधवार दिनांक २८ जानेवारी रोजी राज्यातील सर्व शासकीय कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
सामान्य प्रशासन (राजशिष्टाचार) विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक अनुभवी प्रशासक आणि जनसामान्यांशी नाळ जोडलेला नेता गमावला आहे.

प्रशासनाचा 'दादा' हरपला: अजित पवार यांच्या शिस्तप्रिय कार्यपद्धतीमुळे आणि प्रशासनावरील पकडीमुळे त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात विशेष स्थान होते. त्यांच्या निधनाने एका पर्वाचा अंत झाला असल्याची भावना सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केली आहे.

Comments

No comments yet.