MPSC चा मोठा निर्णय... आता अशा पद्धतीनेच होणार पूर्व परीक्षा...

Share:
Main Image
Last updated: 23-Jul-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २३ जुलै - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. एमपीएससीच्या विविध पूर्व परीक्षा वर्षातून दोन किंवा अधिक वेळा संगणक प्रणालीवर आधारित (CBT - Computer Based Test) पद्धतीने घेण्याचा निर्णय जुलै २०२७ पर्यंत स्थगित करण्यात आला आहे. आयोगाने यासंदर्भात अधिकृत शुद्धिपत्रक प्रसिद्ध करून ही माहिती दिली आहे.

एमपीएससीने २५ जून २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार २०२७ पासून या परीक्षा ऑनलाईन/संगणक आधारित घेण्याचे जाहीर केले होते. मात्र, या निर्णयावर स्पर्धा परीक्षा समन्वय समिती आणि हजारो उमेदवारांनी तीव्र आक्षेप नोंदवत प्रचलित 'ओएमआर' (OMR - ओएमआर शीटवर पेनने गोल करणे) पद्धतीनेच परीक्षा घेण्याची मागणी केली होती.

या परीक्षांवर होणार परिणाम:

आयोगाच्या या निर्णयामुळे खालील प्रमुख पूर्व परीक्षा आता जुलै २०२७ पर्यंत जुन्याच (OMR) पद्धतीने पार पडतील:

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा

Advertisement

महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा

महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा

उमेदवारांच्या मागण्यांची आयोगाकडून दखल

विविध विद्यार्थी संघटना आणि उमेदवारांकडून आयोगाला प्राप्त झालेली निवेदने व मागण्यांचा सहानुभूतीने विचार करून एमपीएससीने संगणक-आधारित (CBT) परीक्षा पद्धतीचा निर्णय तूर्तास स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.