NEET गोंधळाविरोधात ठाकरे बंधू एकवटले... राज आणि उद्धव यांनी केली ही मोठी घोषणा...

Share:
Main Image
Last updated: 23-Jul-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २३ जुलै - 'नीट' (NEET) परीक्षेतील अभूतपूर्व गोंधळ आणि त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर टांगती तलवार निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष विद्यार्थ्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिले आहेत. या प्रश्नावर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऐतिहासिक संयुक्त पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला.

परीक्षेतील गोंधळाविरोधात देशभरात सुरू असलेले आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप करत दोन्ही नेत्यांनी येत्या २६ जुलै २०२६ रोजी मुंबईत संयुक्त मोर्चा काढण्याची घोषणा केली.

"आंदोलकांशी न बोलणे हा सत्तेचा उद्दामपणा" – राज ठाकरे

पत्रकार परिषदेत बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, "NEET परीक्षेत केंद्र सरकारने जो गोंधळ घातला आहे, त्याने विद्यार्थ्यांचे अपरिमित नुकसान झाले आहे. पदावर बसलेल्या व्यक्तीने झालेल्या चुकांची नैतिकता स्वीकारून जबाबदारी घ्यायला हवी. भारतीय जनता पक्ष विरोधात असताना तत्कालीन मंत्र्यांचे राजीनामे मागत होता, मग आता स्वतःच्या मंत्र्यांचा राजीनामा का घेत नाही?"

पुढे बोलताना त्यांनी सरकारच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले, "आम्ही कोणाशी बोलणार नाही किंवा आंदोलनकर्त्यांशी चर्चा करणार नाही, हा सत्तेचा निव्वळ उद्दामपणा आहे."

२६ जुलैला 'छत्रपती शिवाजी महाराज उद्यान ते सिद्धिविनायक' महामोर्चा

Advertisement

विद्यार्थ्यांवरील या अन्यायविरोधात आवाज उठवण्यासाठी २६ जुलै रोजी विशेष मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे:

तारीख व वेळ: रविवार, २६ जुलै २०२६ | सकाळी १०:०० वाजता

मार्ग: छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (शिवाजी पार्क, मुंबई) येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते श्री सिद्धिविनायक मंदिरापर्यंत.

स्वरूप: हा मोर्चा पूर्णपणे अराजकीय असेल. यात कोणत्याही राजकीय पक्षाचे झेंडे असणार नाहीत.

पालकांना सहभागी होण्याचे आवाहन:

"हा प्रश्न केवळ एका परीक्षेचा नसून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सुरू असलेल्या खेळाविरोधात आहे. त्यामुळे या मोर्च्यात विद्यार्थ्यांनी तर सहभागी व्हावेच, पण त्यांच्या पालकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहावे," अशी मनापासून विनंती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.