पालखी मार्गावर जिओचे नेटवर्क कसे आहे?

Share:
Main Image
Last updated: 22-Jul-2026

पुणे, (प्रतिनिधी) २२ जुलै - आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर पंढरपुरात दाखल होणाऱ्या लाखो वारकरी आणि भाविकांसाठी महाराष्ट्रातील अग्रगण्य नेटवर्क असलेल्या रिलायन्स जिओने विशेष पुढाकार घेतला आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर जिओने पंढरपूर शहरासह प्रमुख पालखी मार्गांवरील आपली नेटवर्क यंत्रणा अधिक सक्षम आणि मजबूत केली आहे. यामुळे वारीदरम्यान भाविकांना अखंड, वेगवान आणि विश्वासार्ह कनेक्टिव्हिटीचा अनुभव मिळणार आहे.

शतकानुशतके चालत आलेली पायी वारीची परंपरा ही महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक व आध्यात्मिक वारशाचे प्रतीक आहे. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला देशभरातून लाखो भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात एकत्र येतात. ही अथांग जनसंख्या लक्षात घेऊन जिओने पुणे ते पंढरपूर या सुमारे २४० किलोमीटरच्या संपूर्ण पालखी मार्गावर १०० टक्के 4G आणि तब्बल ९५ टक्के 5G नेटवर्क कव्हरेज यशस्वीरीत्या उपलब्ध करून दिले आहे.

मंदिर परिसर, वाखरी आणि स्थानकांवर विशेष लक्ष

वारीच्या काळात होणारी प्रचंड गर्दी विचारात घेऊन जिओने पंढरपूर शहर, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर आणि रेल्वे स्थानक या महत्त्वाच्या ठिकाणी नेटवर्क क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे. याशिवाय, ऐतिहासिक रिंगण सोहळ्याचे मुख्य केंद्र आणि पालखी मार्गावरील महत्त्वाचा टप्पा असलेल्या वाखरी येथेही नेटवर्क यंत्रणा अधिक बळकट करण्यात आली आहे.

Advertisement

अतिरिक्त नेटवर्क क्षमतेसाठी जिओने ३ 'कव्हरेज ऑन व्हील्स' (COW) म्हणजेच मोबाईल नेटवर्क टॉवर्स तैनात केले आहेत. या तात्पुरत्या टॉवर्समुळे भाविक, नागरिक आणि पर्यटकांना गर्दीच्या ठिकाणीही कॉल ड्रॉप किंवा इंटरनेटचा वेग मंदावणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.

जिओच्या नेटवर्क टीमचे युद्धपातळीवर काम; पोलिसांकडून कौतुक

रिलायन्स जिओच्या तांत्रिक पथकाने अत्यंत नियोजनबद्ध रीतीने आणि युद्धपातळीवर काम करत आषाढी वारी सुरू होण्यापूर्वीच नेटवर्क उन्नतीकरणाचे (Network Upgradation) सर्व काम वेळेत पूर्ण केले आहे.

दरम्यान, जिओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पंढरपूर पोलीस प्रशासनाची भेट घेऊन वारीदरम्यान करण्यात आलेल्या या विशेष नेटवर्क व्यवस्थेची सविस्तर माहिती दिली. लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आणि प्रशासकीय समन्वयासाठी संवाद यंत्रणा अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे आषाढी वारीच्या काळात अशी सक्षम व अखंड कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून दिल्याबद्दल पंढरपूर पोलीस प्रशासनाने रिलायन्स जिओचे कौतुक करत आभार व्यक्त केले आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.