मान्सून केरळात दाखल... गोव्यासह महाराष्ट्रात कधी पोहोचणार? राज्यात ८ जूनपर्यंत असा आहे हवामानाचा इशारा...

Share:
Main Image
Last updated: 04-Jun-2026

 

 

पुणे, (प्रतिनिधी) ४ जून २०२६

उन्हाच्या तीव्र झळांनी होरपळणाऱ्या देशवासीयांसाठी अखेर दिलासादायक बातमी आहे. नैर्ऋत्य मोसमी वारे अर्थात 'मान्सून'ने आपल्या निर्धारित तारखेपेक्षा तीन दिवस उशिराने का होईना, पण देशाच्या मुख्य भू-भागावर दिमाखात प्रवेश केला आहे. गुरुवारी (ता. ४) मान्सूनने संपूर्ण केरळ राज्य काबीज केले असून, त्याची महाराष्ट्राच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू झाली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (IMD) निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

Advertisement

 मान्सूनची आतापर्यंतची मजल
मान्सूनने केरळसह तामिळनाडूच्या कन्याकुमारी
, तिरुणवेल्ली आणि थूथुकुडी जिल्ह्यांमध्ये प्रवेश केला आहे. तसेच, कर्नाटकच्या मंगळूर आणि उटीपर्यंतच्या भागापर्यंत मजल मारत मान्सून सक्रिय झाला आहे.

पुढील प्रवास: महाराष्ट्रात कधी येणार?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार
, सध्या मान्सूनच्या पुढील प्रवासासाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या २ ते ३ दिवसांत मान्सून उर्वरित कर्नाटक, तामिळनाडूचा काही भाग आणि संपूर्ण गोवा काबीज करेल. त्यानंतर, महाराष्ट्रात प्रथमत: सिंधुदुर्गातील वेंगुर्ल्याच्या मार्गाने तो राज्यात प्रवेश करेल, असे संकेत मिळत आहेत.

८ जूनपर्यंत राज्यात मुसळधार पूर्वमोसमी!
राज्यात मान्सून दाखल होण्यापूर्वीच अंतर्गत भागात पूर्वमोसमी (वलसाडी) पावसाने जोर धरला आहे. पुढील ४ दिवस म्हणजेच सोमवार, दि. ८ जूनपर्यंत मुंबईसह कोकण आणि उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह अवकाळी पूर्वमोसमी पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोणती प्रणाली ठरतेय पूरक?
महाराष्ट्राकडे होणारी मान्सूनची वाटचाल आणि राज्यातील पूर्वमोसमी पावसासाठी सध्या अरबी समुद्रात निर्माण झालेली हवेची स्थिती पूरक ठरत आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ५.८ किलोमीटर उंचीपर्यंत, मराठवाडा ते कोकण व गोवा पार करत थेट नैर्ऋत्य अरबी समुद्रापर्यंत सध्या 'हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राचा आस' (Trough) पसरला आहे. हीच हवामान प्रणाली सध्याच्या गतिमान घडामोडींना मोठी ताकद देत आहे.

Advertisement

Comments

No comments yet.