स्वावलंबनातून समाज सक्षमीकरणाचा ध्यास... नवहितगुज महिला मंडळाकडून ७ महिलांना शिलाई व पिको फॉल मशीनचे वाटप...

Share:
Main Image
Last updated: 03-Jun-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ३ जून - 
"स्वावलंबनातून समाज सक्षमीकरण असा ध्यास उराशी बाळगून आम्ही 'आत्मनिर्भर नारी' हा उपक्रम सुरू केला आहे. महिलांनी महिलांसाठी खंबीरपणे उभे राहिल्यास समाज बदलायला वेळ लागत नाही. एका महिलेचा हात बळकट केला, तर एक संपूर्ण कुटुंब सक्षम होते आणि कुटुंब सक्षम झाले की समाज आपोआप पुढे जातो," असे प्रतिपादन लाडशाखीय वाणी समाज नवहितगुज महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रतिभा वाणी यांनी केले.
नवहितगुज महिला मंडळातर्फे खुटवडनगर येथील माहेरघर मंगल कार्यालयात समाजातील गरजू, विधवा, परित्यक्ता आणि निराधार महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी ५ शिलाई मशिन्स आणि २ पिको फॉल मशिन्सचे हस्तांतरण करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना त्यांनी, या शिलाई मशिन्स गरजू महिलांच्या आयुष्यात आशेचा नवा अंकुर फुलवतील, असा विश्वास व्यक्त केला.
दात्यांनी मदतीसाठी पुढे यावे: नयना अमृतकर
या प्रसंगी समिती प्रमुख नयना अमृतकर यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी अर्ज करण्याची पद्धत आणि अर्जांची काटेकोर तपासणी करून खऱ्या गरजवंतांपर्यंत मदत कशी पोहोचवली जाते, याविषयी सविस्तर माहिती दिली. "मंडळाकडे अजूनही अनेक गरजू महिलांचे अर्ज आलेले आहेत. हा उपक्रम पुढे सुरू ठेवण्यासाठी पुरेसा निधी आवश्यक असून, समाजातील दात्यांनी स्वतःहून यासाठी पुढे यावे," असे आवाहन त्यांनी केले.

Advertisement

कार्यक्रमाचे संयोजन आणि प्रमुख उपस्थिती:
कार्यक्रमाचे पदाधिकारी: शिलाई मशीन हस्तांतर करताना लाभार्थ्यांचा परिचय वैशाली कोठावदे यांनी करून दिला. हस्तांतरण समितीमध्ये प्रांजल कोठावदे, सुनीता वाणी, श्वेता सोनजे यांनी काम पाहिले. उपक्रम प्रमुख व मंडळाच्या सल्लागार सौ. संध्याताई कोठावदे यांनी महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन व आभार: कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन दिपाली वाणी यांनी केले, तर आभार ज्योत्स्ना मोराणकर यांनी मानले.
प्रमुख अतिथी: या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रियांका कोठावदे, अर्चना घरटे, वर्षा महाजन, वेदिका कोठावदे, श्रीमती शोभा कोतकर, शैलजा कोठावदे, मिताली कोतकर, अंजली सोनजे आणि २५० हून अधिक महिला सदस्य उपस्थित होत्या.
मंडळाच्या टीमकडून अहोरात्र परिश्रम
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या अध्यक्षा प्रतिभा वाणी, उपाध्यक्ष प्रणाली बागड, सचिव चारू शिरोडे, सहसचिव रुपाली येवले, खजिनदार लीना बागड, सहखजिनदार सीमा सोनजे, सल्लागार उज्ज्वला कोठावदे आणि संध्या कोठावदे यांच्यासह ज्योत्स्ना मोराणकर, सरिता शिरोडे, पल्लवी वेढणे, प्रांजल कोठावदे, रुपाली वाणी, सारिका राणे, नयना अमृतकर, वैशाली कोठावदे, सुनीता वाणी, मोनाली अमृतकर, सुनंदा दशपुते, निलिमा चिंचोरे, संगीता अमृतकर, दीपाली वाणी आणि श्वेता सोनजे यांनी प्रचंड मेहनत घेतली.
या प्रसंगी सीए मयूर कोठावदे, गिरीश महाजन, प्रसाद बागड, रमेश मोराणकर, संजय शिरोडे, प्रशांत अमृतकर, किशोर सोनजे, दिनेश कोठावदे, प्रमोद शिरोडे, वैभव येवला यांच्यासह मंडळाच्या सर्व माजी अध्यक्षा व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

No comments yet.