१६२ किमीच्या या रेल्वे मार्गासाठी भूमी अधिग्रहण सुरू...  केंद्र सरकारकडून राजपत्र प्रसिद्ध... इंग्रज काळापासून होती प्रतीक्षा...

Share:
Main Image
Last updated: 03-Jun-2026

बुलढाणा, (प्रतिनिधी) ३ जून - बुलढाणा आणि जालना जिल्ह्यांच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक समजल्या जाणाऱ्या 'खामगाव-जालना' नवीन रेल्वे मार्गासाठी (१६२ किमी) जमीन संपादनाची अधिकृत अधिसूचना केंद्र सरकारच्या राजपत्रात (Gazette) प्रसिद्ध झाली आहे. हा प्रकल्प मध्य रेल्वे अंतर्गत "विशेष रेल्वे प्रकल्प" म्हणून अधिसूचित करण्यात आला आहे. यामुळे इंग्रज काळापासून प्रलंबित असलेल्या या रेल्वे मार्गाचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार असून, हा बुलढाणा जिल्ह्यासाठी मोठा आनंदाचा क्षण आहे. बुलढाण्याचे खासदार आणि केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या सातत्यपूर्ण आणि यशस्वी पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाचा टप्पा गाठता आला आहे. या यशाबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे विशेष आभार मानले आहेत.

५०% निधी राज्य सरकार देणार; केंद्राचीही मंजुरी
हा महत्त्वाकांक्षी रेल्वे मार्ग 'पुंजी निवेश कार्यक्रमांतर्गत' मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या एकूण खर्चाचा ५० टक्के वाटा उचलण्याची तयारी महाराष्ट्र सरकारने दाखवली असून, त्याची आर्थिक तरतूदही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता, त्याला आता केंद्र सरकारने अंतिम मंजुरी दिली आहे.

Advertisement

रेल्वे (सुधारणा) अधिनियम २००८ अंतर्गत 'विशेष प्रकल्प'
राजपत्रात नमूद केल्यानुसार, रेल्वे (सुधारणा) अधिनियम २००८ च्या कलम ३७A अन्वये या १६२ किमी लांबीच्या नवीन ब्रॉडगेज (BG) मार्ग प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. हा प्रकल्प सार्वजनिक उद्देशासाठी आणि राष्ट्रीय पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी हाती घेतला जात असून, अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून हा कायदा लागू झाला आहे.

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या १५ वर्षांच्या प्रयत्नांना यश!
प्रदीर्घ मागणी: खामगाव-जालना रेल्वे मार्ग व्हावा ही बुलढाणा जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाची अनेक दशकांपासूनची मागणी होती. लोकसभेच्या अनेक निवडणुका याच मुद्द्यावर लढवल्या गेल्या.
२००९ पासून पाठपुरावा: प्रतापराव जाधव हे २००९ मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आल्यापासून त्यांनी लोकसभेत हा प्रश्न लावून धरला. त्यांच्या प्रयत्नांमुळे आधी सर्वेक्षणाला मंजुरी मिळाली आणि नंतर केंद्र सरकारने याला तत्त्वतः मान्यता दिली.
पंतप्रधानांचे आश्वासन पूर्ण: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान खामगाव येथील जाहीर सभेत हा रेल्वे मार्ग पूर्ण करण्याचे आश्वासन जिल्हावासीयांना दिले होते, ते आता पूर्ण होत आहे.
नेत्यांचे सहकार्य: या प्रकल्पासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून ५० टक्के निधी मिळवून देण्यात प्रतापराव जाधव यांनी महत्त्वाची भूमिका बजावली

?s=20

Comments

No comments yet.