ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यांनाच मोदींनी मुख्यमंत्री केले... ही यादी बघून तुम्हीही चकित व्हाल!

Share:
Main Image
Last updated: 10-May-2026

पुणे, (प्रतिनिधी) १० मे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "ना खाऊंगा, ना खाने दूंगा" या घोषणेवर बोट ठेवत, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी एक खळबळजनक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. विविध राज्यांमध्ये ज्या नेत्यांवर भाजपने किंवा खुद्द मोदींनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले, त्यांनाच पुढे भाजपने मुख्यमंत्रीपदावर कसे बसवले, याचा पाढाच चौधरींनी वाचला आहे. त्यांची ही पोस्ट सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे.

आरोपी ते मुख्यमंत्री: चौधरींनी दिलेली उदाहरणे
विश्वंभर चौधरी यांनी आपल्या पोस्टमध्ये अनेक राज्यांतील प्रमुख नेत्यांच्या नावांचा उल्लेख केला आहे:

आसाम: हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर मोदींनी लुई बर्गर घोटाळ्यात आरोप केले होते, मात्र आज ते आसामचे मुख्यमंत्री आहेत.

पश्चिम बंगाल: सुवेंदू अधिकारी यांचा लाच घेतानाचा व्हिडिओ भाजपने सभेमध्ये दाखवला होता, आज ते बंगालमध्ये भाजपचे मुख्य नेतृत्व करत आहेत. अधिकारी यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. 

बिहार: सम्राट चौधरी यांच्यावर वय लपवल्याचे आणि घोटाळ्याचे आरोप मोदींनी केले होते, आज ते बिहारमध्ये मुख्यमंत्री झाले आहेत.

Advertisement

अरुणाचल प्रदेश : पेमा खांडू हे काँग्रेसमध्ये असताना त्यांच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, आज ते भाजपचे मुख्यमंत्री म्हणून राज्य करत आहेत.

 मणिपूर:  एन. बिरेन सिंह हे काँग्रेसमध्ये असताना त्यांच्यावर भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, नंतर त्यांनाच भाजपने मुख्यमंत्री म्हणून बसविले. मणिपूरात हिंसाचार झाला आणि सिंह यांना पद गमवावे लागले.  

गोवा आणि त्रिपुरा: दिगंबर कामत (गोवा) आणि माणिक सहा (त्रिपुरा) यांच्यावरही भाजपने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, पण आज ते भाजपच्या गोटात महत्त्वाच्या पदांवर आहेत.

'ना खाऊंगा ना खाने दूंगा' वर खोचक टीका
विश्वंभर चौधरी यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी अत्यंत खोचक टिप्पणी केली आहे. ते म्हणतात, "ज्याला मुख्यमंत्री व्हायचे आहे, त्याने आधी इतर पक्षात मजबूत पैसा खाल्ल्याचे आरोप मोदीजींकडून करून घ्यावेत. मग पुढची सगळी काळजी मोदीजी घेतात."

सोशल मीडियावर पडसाद
या पोस्टमुळे भाजपच्या 'आयात' नेत्यांच्या धोरणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ज्या नेत्यांविरुद्ध भाजपने रान उठवले, त्यांनाच सत्तेत सामावून घेतल्याने भाजपची "नैतिकता" कुठे गेली, असा सवाल नेटिझन्स विचारत आहेत. राज्याराज्यात अशा प्रकारे आयात केलेल्या मंत्र्यांची यादी मोठी असल्याचेही चौधरी यांनी नमूद केले आहे.

https://www.facebook.com/share/p/14f9tJ2DV3v/

Comments

No comments yet.