उन्हाळ्यात राज्यामध्ये लोडशेडींग होणार का? आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री म्हणाले...

Share:
Main Image
Last updated: 19-Apr-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १९ एप्रिल - वीजनिर्मिती आणि वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी ऊर्जा विभाग तसेच संबंधित यंत्रणांनी ‘एआय’चा वापर करून यासंदर्भातील व्यवस्थापन करण्यावर भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे उन्हाळ्याच्या काळातील ‘पीक डिमांड’ संदर्भात वीज वितरण आढावा बैठक झाली. यावेळी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा, प्रधान सचिव डॉ श्रीकर परदेशी, टाटा पॉवर, अदाणी पॉवरचे व ‘बेस्ट’चे प्रतिनिधी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, उन्हाळा व पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा विभाग व संबंधित यंत्रणांनी वीजनिर्मिती व पुरवठा सुरळीत राहण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना युद्धपातळीवर कराव्यात. यासाठीच्या व्यवस्थापनासाठी तसेच देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी ‘एआय’चा वापर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

Advertisement

आवश्यक वीजनिर्मिती व सुरळीत वीजपुरवठ्यासाठी यंत्रणा सज्ज

रुफटॉप सौर ऊर्जेमुळे फायदा होत आहे. वीज निर्मितीसाठी पुरेसा कोळसा व पाण्याची उपलब्धताही आहे. वीजनिर्मिती व पुरवठा सुरळीत रहावा यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात मॉन्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीची कामेही करण्यात येत आहेत. आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती यावेळी ऊर्जा विभागामार्फत देण्यात आली‌.

पुरेशा वीज खरेदीची व्यवस्था

Comments

No comments yet.