स्वरमयी पर्वाचा अस्त...  गानसम्राज्ञी आशा भोसले यांचे निधन...

Share:
Main Image
Last updated: 12-Apr-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १२ एप्रिल -  भारतीय संगीत क्षेत्रातील एक अढळ तारा आज निखळला. आपल्या मधाळ आणि अष्टपैलू आवाजाने तब्बल सहा दशकांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गानसम्राज्ञी आशा भोसले यांचे आज निधन झाले. त्या ९३ वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाने भारतीय संगीत सृष्टीतील एका सुवर्णयुगाचा अंत झाला आहे. आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी त्यांच्या निधनाचे वृत्त अधिकृतपणे दिले. आशाताईंच्या जाण्याने संगीत क्षेत्रातून आणि सर्वच थरांतून शोक व्यक्त केला जात आहे.

प्रकृती आणि उपचार
मिळालेल्या माहितीनुसार, ११ एप्रिल रोजी प्रकृती अस्वास्थ्यामुळे आशाताईंना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र वाढते वय आणि सर्व अवयव निकामी झाल्यामुळे आज त्यांची प्राणज्योत मालवली, असे रुग्णालयातील डॉक्टरांनी स्पष्ट केले.

उद्या अंत्यसंस्कार
आशा भोसले यांच्या पार्थिवावर उद्या सायंकाळी ४ वाजता मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सहा दशकांचा सांगितिक प्रवास
आशा भोसले यांनी केवळ हिंदीच नव्हे, तर मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ आणि तेलुगू अशा विविध भाषांमध्ये हजारो गाणी गायली आहेत. त्यांच्या आवाजातील लवचिकता आणि भावपूर्णता अद्वितीय होती.

दिग्गज संगीतकारांसोबत काम: त्यांनी आर.डी. बर्मन, ओ.पी. नैय्यर, सचिन देव बर्मन, आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांसारख्या दिग्गज संगीतकारांसोबत काम करून अनेक अजरामर गाणी दिली.
गाजलेली गाणी: 'दम मारो दम' पासून 'ओम शांती ओम' पर्यंत आणि अनेक क्लासिक मराठी गीतांपासून ते पाश्चात्य ढंगाच्या गाण्यांपर्यंत त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला.

आशाताईंच्या निधनाने केवळ भोसले कुटुंबच नव्हे, तर अवघा भारत देश आणि जगभरातील त्यांचे कोट्यवधी चाहते दुखाच्या छायेत आहेत. एका अष्टपैलू गायिकेला आज देश मुकला आहे.

आशाताईंच्या निधनाचे वृत्त मिळताच समाजाच्या सर्व स्तरातून दुःख व्यक्त केले जात आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

?s=20

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आशाताईंचा आवाज कालातीत होता असे सांगतानाच त्यांच्यासोबतच्या आठवणी सदैव जपून ठेवेन असे म्हटले आहे.

?s=20

बदलांना सहज आत्मसात करणाऱ्या अशा अष्टपैलू गायिक पुन्हा होणे नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Advertisement

?s=20

 

 

Comments

No comments yet.