इंदिरा नगर आणि म्हसरूळमध्ये दोघांची आत्महत्या...

Share:
Main Image
Last updated: 08-Apr-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ८ एप्रिल - शहर परिसरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून मंगळवारी (दि.७) वेगवेगळ््या भागात राहणाºया दोघांनी आत्महत्या केली. त्यातील एकाने विषारी औषध सेवन करून तर दुसºयाने गळफास लावून घेत आपले जीवन संपविले. दोघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत इंदिरानगर व म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार इंदिरानगर भागातील आनंद नरहर जोशी (६० रा. सुवाशिनी सहनिवास अपा. बापू बंगल्याजवळ) यांनी अज्ञात कारणातून गेल्या शुक्रवारी (दि.३) विषारी औषध सेवन केले होते. मुलगी रमणी जोशी यांनी त्यांना तात्काळ नारायणी हॉस्पिटल येथे दाखल केले होते. 

उपचार सुरू असताना मंगळवारी डॉ. नेहा गेडाम यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याबाबत डॉ.मोनिका शिंदे यांनी दिलेल्या खबरीवरून पोलीस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून जमादार साळी तपास करीत आहेत. 

Advertisement

दुसरी घटना प्रभातनगर भागात घडली. राजेंद्र शिवाजी खरात (३३ रा. सोमनाथ अपा.प्रभातनगर म्हसरूळ) यांनी मंगळवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील हॉलमध्ये पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता.

 कुटूंबियांनी त्याना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता रात्री उपचार सुरू असताना डॉ.डी.एस.पालवे यांनी तपासून मृत घोषित केले. 

याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून हवालदार बाराईत तपास करीत आहेत.

Comments

No comments yet.