नाशिक (प्रतिनिधी) २८ मार्च - नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (NDCC) द्वारका येथील मुख्य कार्यालय स्थलांतरित करण्यामागे भोंदू कॅप्टन अशोक खरातचा अंधश्रद्धायुक्त सल्ला होता का? असा खळबळजनक संशय महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील एका बड्या लोकप्रतिनिधीच्या संपर्कात असलेला हा भोंदू केवळ राजकीय प्रचारातच नव्हे, तर प्रशासकीय निर्णयांमध्येही हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करत, पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी ‘अंनिस’ने केली आहे.
स्मशानभूमीच्या जागेमुळे बँक हलवली?
द्वारका चौकातील मोक्याच्या ठिकाणी कोट्यवधी रुपये खर्च करून जिल्हा बँकेची अद्ययावत इमारत उभारण्यात आली होती. ग्रामीण भागातील लोकांसाठी हे ठिकाण अत्यंत सोयीचे असतानाही, काही वर्षांपूर्वी अचानक हे कार्यालय सीबीएस परिसरातील इमारतीत हलवण्यात आले. त्यावेळी 'द्वारका येथील इमारत स्मशानभूमीच्या जागेवर असल्याने बँकेची आर्थिक प्रगती होत नाही आणि कर्ज वसुली थंडावली आहे,' असे अंधश्रद्धायुक्त तर्क काही संचालकांकडून लावले गेले होते. यामागे कॅप्टन खरातचा 'अदृश्य' हात होता का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
निवडणुकीत जादूटोणा आणि खासगी सुरक्षारक्षक
संबंधित लोकप्रतिनिधीच्या १९९९ च्या निवडणूक प्रचारात खरात सक्रिय होता. विरोधी उमेदवाराने एका बाबाला पाचारण केल्याने त्याला पर्याय म्हणून या लोकप्रतिनिधीने खरातची मदत घेतली होती, अशी माहिती अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा
कॅबिनेट मंत्र्यांशी कनेक्शन?
अंनिसने केलेल्या आरोपांनुसार, खरातच्या संपर्कात केवळ एक लोकप्रतिनिधीच नाही, तर एक विद्यमान कॅबिनेट मंत्रीदेखील आहेत. हे मंत्री आपल्या शासकीय आणि प्रशासकीय बैठकांचे आयोजन खरातने सुचवलेल्या 'मुहूर्तावर' करत असल्याचे समजते. एका जबाबदार पदावरील व्यक्तीने भोंदूगिरीला खतपाणी घालणे हे लोकशाहीसाठी घातक असल्याचे अंनिसचे म्हणणे आहे.
काळ्या विद्येचे जाळे आणि ५५ कोटींचे मंदिर
निफाड तालुक्यातील 'बडेबाबा' उर्फ गणेश जयराम जगताप हा काळ्या विद्येसाठी कुप्रसिद्ध असून, त्याने राज्यात कामाख्या देवीचे ५५ कोटींचे मंदिर उभारले आहे. या बडेबाबाचे आणि कॅप्टन खरातचे काय संबंध आहेत? तसेच नाशिकमधील काही आध्यात्मिक पंथांची या भोंदूगिरीत भागीदारी आहे का? याचाही तपास पोलिसांनी करावा, अशी मागणी अंनिसच्या वतीने राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे, कृष्णा चांदगुडे आणि महेंद्र दातरंगे यांनी केली आहे.
"१९९९ च्या प्रचारापासून हा भोंदू खरात संबंधित लोकप्रतिनिधीच्या संपर्कात आहे. ईव्हीएमवर जादूटोणा करण्यासारखे प्रकार लोकशाहीला कलंकित करणारे आहेत. या सर्व प्रकरणाचे धागेदोरे तपासण्यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाला माहिती दिली असून सखोल चौकशीची विनंती केली आहे."
— कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, महाराष्ट्र अंनिस.