येवल्यासाठी खुशखबर... गंगासागर तलाव भरला...  शहरातील पाणी टंचाई दूर...

Share:
Main Image
Last updated: 26-Mar-2026

येवला, (प्रतिनिधी) २६ मार्च - येवला शहरातील नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी प्रशासनाने सुयोग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. पालखेड कालव्याच्या माध्यमातून गंगासागर तलाव भरल्यामुळे शहरातील पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात दूर होणार असली, तरी उन्हाळ्याच्या दृष्टीने उपलब्ध पाण्याचा काटकसरीने व नियोजनबद्ध वापर करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने सुयोग्य नियोजन करावे असे प्रतिपादन माजी खासदार समीर भुजबळ यांनी केले. येवला शहराला पिण्याचा पाणी पुरवठा करणारा गंगासागर तलाव पालखेडच्या आवर्तनाने भरण्यात आला आहे. या तलावाच्या जलपूजन आज माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, उपनगराध्यक्षा पुष्पा गायकवाड, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार,येवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर,  शहराध्यक्ष दत्ता निकम, येवला नगरपालिकेचे गटनेते दिपक लोणारी, पाणी पुरवठा सभापती चैताली शिंदे, नगरसेवक गोटू मांजरे, नगरसेवक महेश काबरा, नगरसेवक पारुल गुजराथी, नगरसेवक जावेद लखपती, नगरसेवक अमजद शेख, नगरसेवक बंटी परदेशी, गुड्डू जावळे, गणेश गायकवाड, निसार शेख, सुनील पैठणकर, नितीन गायकवाड, समाधान जेजुरकर, भूषण लाघवे, दिपक गायकवाड, मलिक मेंबर, पार्थ कासार, नवनाथ थोरात, सौरभ जगताप, समाधान पगारे, दीपक पवार, आदित्य कानडे, राकेश कुंभारे, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले की, गंगासागर तलाव भरल्यामुळे येवला शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे. मात्र पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. तसेच पुढील आवर्तन मिळेपर्यंत साठवलेले पाणी पुरेल, या दृष्टीने नियोजन करण्यात यावे. नागरिकांनाही पाणी बचतीची जाणीव ठेवून जबाबदारीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांनी नगरपालिकेच्या फिल्टरेशन प्लांट ची पाहणी केली. या प्लांटची नियमित स्वच्छता करून स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात यावा अशा सूचना देखील त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

Comments

No comments yet.