इराण युद्धामुळे भारतात लॉकडाऊन लागणार? कुठल्या क्षेत्रांना सर्वाधिक फटका? पंतप्रधान मोदी संसदेत म्हणाले...

Share:
Main Image
Last updated: 24-Mar-2026

नवी दिल्ली, (प्रतिनिधी) २४ मार्च - ऊर्जेच्या क्षमतेने  250 गिगावॅट्सचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे. गेल्या  11 वर्षांत केवळ सौर ऊर्जेची क्षमताच सुमारे 3 गिगावॅट्सवरून 140 गिगावॅट्सपर्यंत वाढली असल्याचे, तसेच सुमारे 40 लाख घरांच्या छतांवर सौर ऊर्जा यंत्रणा उभारण्यात आल्या असल्याचे, त्यांनी नमूद केले.  'गोबरधन'  योजनेअंतर्गत 200 कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प आता कार्यरत आहेत आणि अणुऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन दिले जात आहे. यासोबतच, नव्याने मंजूर करण्यात आलेल्या 'लघु जलविद्युत विकास योजने'मुळे पुढील पाच वर्षांत 1,500 मेगावॅट्सची अतिरिक्त क्षमता निर्माण होईल.  या सर्व बाबींचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी यांनी ठामपणे सांगितले, "हे सर्व प्रयत्न आज देशाच्या खूप कामी येत  असून ते भारताचे ऊर्जेच्या क्षेत्रातील भविष्य अधिकच सुरक्षित करतील."

पश्चिम आशियातील संघर्षावर भारताच्या राजनैतिक प्रतिसादाबद्दल बोलताना पंतप्रधानांनी, तीव्र चिंता व्यक्त करणे, तणाव कमी करण्याचे समर्थन आणि नागरिक तसेच ऊर्जा आणि वाहतूक पायाभूत सुविधांवरील हल्ल्यांना विरोध अशा गोष्टींचा त्यामध्ये समावेश असल्याचे सांगत भारताची भूमिका सुरुवातीपासूनच स्पष्ट असल्याचे सांगितले. आपण पश्चिम आशियातील सर्व संबंधित नेत्यांशी चर्चा केली असून त्यांना तणाव कमी करून संघर्ष संपवण्याचे आवाहन केले आहे, अशी माहिती त्यांनी सभागृहाला दिली तसेच व्यापारी जहाजांवरील हल्ले आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीसारख्या आंतरराष्ट्रीय जलमार्गांवरील वाहतुकीत अडथळा आणणे पूर्णपणे अस्वीकारार्ह आहे यावर भर देत "भारत, युद्धाच्या वातावरणातही राजनैतिक मार्गाने भारतीय जहाजांच्या सुरक्षित प्रवासासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे," असे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले.

मानवता आणि शांततेप्रती भारताच्या अढळ वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच तोडगा काढण्याचा एकमेव मार्ग असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. भारताचा प्रत्येक प्रयत्न तणाव कमी करणे आणि शत्रुत्व थांबवणे या उद्देशानेच केला जात असून, या युद्धात जीविताला कोणताही धोका निर्माण होणे मानवतेच्या हिताच्या विरोधात असल्याचे नमूद करून "सर्व पक्षांना लवकरात लवकर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी प्रोत्साहित  करणे, हा भारताचा प्रयत्न आहे," मोदी म्हणाले,

Advertisement

?s=20

पंतप्रधानांनी या संकटाच्या अंतर्गत सुरक्षेच्या पैलूकडे सभागृहाचे लक्ष वेधत काही घटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा इशारा दिला. सर्व कायदा आणि सुव्यवस्था यंत्रणांना सतर्क करण्यात आले असून किनारपट्टी, सीमावर्ती भाग, सायबर आणि सामरिक प्रतिष्ठाने अशा सर्व क्षेत्रांमधील सुरक्षा अधिक बळकट केली जात असल्याचे पंतप्रधान मोदींनी सभागृहाला सांगितले. "किनारी सुरक्षा असो वा सीमा सुरक्षा असो, सायबर सुरक्षा असो किंवा सामरिक प्रतिष्ठाने असोत, सर्वांची सुरक्षा आणखी भक्कम केली जात आहे," असे पंतप्रधानांनी सांगितले.

आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधानांनी या युद्धामुळे निर्माण झालेली कठीण जागतिक परिस्थिती दीर्घकाळ टिकण्याची शक्यता असल्याचे नमूद करत कोविड-19 महामारीच्या  काळात देश ज्याप्रमाणे एकजुटीने उभा राहिला होता, त्याचप्रमाणे आताही देशाने सज्ज आणि एकजूट राहण्याची गरज व्यक्त केली. अशा स्थितीत संयम, आत्मनिग्रह आणि दक्षता बाळगण्याचे आवाहन करत मोदींनी खोट्या बातम्या पसरवून, काळाबाजार करून किंवा साठेबाजी करून परिस्थितीचा गैरफायदा घेणाऱ्यांपासून सावध राहण्याचा  इशारा दिला. तसेच, अशा घटकांवर काटेकोरपणे लक्ष ठेवून त्यांच्यावर तातडीने कारवाई होईल याची खबरदारी घेण्याचे आवाहन त्यांनी सभागृहाच्या माध्यमातून सर्व राज्य सरकारांना केले. देशाच्या सामूहिक निर्धारावर आपला दृढ विश्वास व्यक्त करत, "जेव्हा या देशातील प्रत्येक सरकार आणि प्रत्येक नागरिक एकत्र येतो, तेव्हा आपण कोणत्याही आव्हानाचा सामना करू शकतो, हीच आपली ओळख आणि हीच आपली ताकद आहे," असे पंतप्रधान मोदींनी ठामपणे सांगितले.

Comments

No comments yet.