सप्तशृंग चैत्रोत्सव... तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी थेट गडावर... झाले हे महत्वाचे...

Share:
Main Image
Last updated: 22-Mar-2026

 

नाशिक (प्रतिनिधी), २२ मार्च २२०२६

उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या सप्तशृंग गडावरील श्री सप्तशृंगी देवीचा चैत्र यात्रोत्सव येत्या २६ मार्चपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांची सुरक्षा, दर्शन व्यवस्था आणि पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज गडावर प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. "भाविकांची सुरक्षितता हीच प्रशासनाची प्राथमिकता असून, सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे," अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर विशेष सोयी

सध्या वाढता उन्हाळा लक्षात घेता, गडावर येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याचे शुद्ध पाणी, सावलीची व्यवस्था आणि आरोग्य सेवा सज्ज ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मंदिर परिसरात गर्दीचे नियोजन करताना भाविकांना टप्प्याटप्प्याने दर्शनासाठी सोडण्यात येणार असून, स्वच्छतेबाबत कोणतीही तडजोड करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त

यात्रोत्सवात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनीही गड परिसराची पाहणी करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. विशेष म्हणजे, यात्रेच्या संपूर्ण नियोजनावर देखरेख ठेवण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी कश्मिरा संखे यांची 'इन्सिडंट कमांडर' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

यांची होती उपस्थिती

या आढावा बैठकीस तहसीलदार रोहिदास वारुळे, पोलीस निरीक्षक टेंभेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता श्रीमती वसावे, वीज वितरण कंपनीचे अधिकारी, जिल्हा परिषदेचे प्रतिनिधी, गडाचे विश्वस्त, उपसरपंच संदीप बेनके आणि प्रदीप निकम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

प्रमुख सूचना आणि निर्णय:

 

Comments

No comments yet.