शेतकऱ्यांना कर्जमाफी... देवेंद्र फडणवीस यांची बजेटमध्ये घोषणा... कुणाला मिळणार लाभ?

Share:
Main Image
Last updated: 06-Mar-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ६ मार्च - राज्यातील बळीराजाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने आज मोठी घोषणा केली आहे. अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' जाहीर केली. या योजनेअंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेले २ लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज पूर्णपणे माफ केले जाणार आहे.

नाव बदलले, व्याप्ती वाढली
यापूर्वी ही योजना 'महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९' या नावाने राबवली जात होती. आता सरकारने या योजनेचे नामकरण करून ती नव्या स्वरूपात सादर केली आहे. विशेष म्हणजे, ज्या शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाचे हप्ते नियमितपणे भरले आहेत, त्यांच्यावरही अन्याय होऊ नये म्हणून सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अशा नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे.

Advertisement

ठळक वैशिष्ट्ये:
थकीत कर्जमाफी: ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या २ लाख रुपयांपर्यंतच्या थकीत कर्जाला माफी.
प्रोत्साहन निधी: प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५०,००० रुपयांची रोख मदत.
योजनेचे नाव: आता 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' म्हणून ओळखली जाणार.
उद्देश: ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणे आणि शेतकऱ्यांवरील कर्जाचा डोंगर कमी करणे.

या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर ग्रामीण भागातून सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत.

Comments

No comments yet.