मुंबई, (प्रतिनिधी) १३ फेब्रुवारी - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनाने महाराष्ट्र आजही धक्क्यात असतानाच, या अपघाताच्या चौकशीवरून आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केलेली एक खळबळजनक शंका आता सत्याच्या जवळ जाताना दिसत आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) जाहीर केलेल्या विशेष ऑडिटच्या यादीतून संबंधित विमान कंपनीचे नाव वगळण्यात आल्याने संशयाची सुई अधिक गडद झाली आहे.
नेमके प्रकरण काय?
अजित पवार यांचा ज्या विमानात अपघात झाला, ती VSR ही चार्टर कंपनी वादाच्या भोऱ्यात सापडली आहे. रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच आरोप केला होता की, "DGCA मधील अनेक माजी अधिकारी सध्या VSR कंपनीत मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. त्यामुळे या कंपनीला वाचवण्याचा आणि त्यांच्या चुकांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न DGCA कडून होऊ शकतो."
ऑडिटच्या यादीतून कंपनी गायब! देशातील चार्टर कंपन्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर DGCA ने सर्व प्रमुख कंपन्यांचे 'स्पेशल ऑडिट' करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पहिल्या टप्प्यात १४ मोठ्या कंपन्यांची निवड करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या कंपनीच्या विमानात एवढा मोठा अपघात झाला आणि राज्याच्या एका बड्या नेत्याला प्राण गमवावे लागले, त्या VSR कंपनीचा या पहिल्या १४ कंपन्यांच्या यादीत समावेश नाही.
रोहित पवारांच्या आरोपाला पुष्टी?
या घडामोडींमुळे रोहित पवारांच्या आरोपांना आता पुष्टी मिळताना दिसत आहे. जर कंपनीची चौकशीच होणार नसेल, तर सत्य बाहेर कसे येणार? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
"एकीकडे कडक चौकशीचे आश्वासन दिले जाते आणि दुसरीकडे संशयाच्या भोऱ्यात असलेल्या कंपनीला ऑडिटमधून वगळले जाते, हे कुणाला तरी वाचवण्याचे कारस्थान तर नाही ना?" असा सवाल आता राजकीय विश्लेषकांकडून विचारला जात आहे.
'सुपरफास्ट नाशिक'चे मुख्य संपादक, ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक भावेश ब्राह्मणकर यांचे 'अरुणोदय' पुस्तक प्रकाशन पूर्व बुकिंगसाठी उपलब्ध झाले आहे.
प्रथितयश दिलीपराज प्रकाशनाने २५ टक्के घसघशीत सूट त्यासाठी दिली आहे.
पुस्तक बुकिंगसाठी खालील लिंकवर क्लिक करावे
https://www.diliprajprakashan.in/products/arunoday-by-bhavesh-brahmankar