माणिकराव खुळे
सेवानिवृत्त हवामान शास्त्रज्ञ
१- काल मंगळवार दि.६ जानेवारी (अंगारकी चतुर्थी)पर्यन्त जाणवलेल्या किरकोळ थंडीनंतर आजपासून पुढील ३ दिवस म्हणजे शुक्रवार दि. ९ जानेवारी पर्यन्त मुंबई सह कोकण वगळता उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात सकाळच्या वेळेस माफक थंडी जाणवेल.
मुंबईसह कोकणात १७ ते २१ तर उर्वरित महाराष्ट्रात ९ ते १२ अंश से. दरम्यान किमान तापमान जाणवेल. परंतु सांगली सोलापूर कोल्हापूर बुलढाणा येथे मात्र १२ अंश से पेक्षा अधिक किमान तापमानाची नोंद होवु शकते.
२- त्यानंतर म्हणजे शनिवार दि. १० जानेवारी ते बुधवार दि. १४ जानेवारी(मकर संक्रांती) पर्यंतच्या पुढील पाच दिवसात पहाटेच्या किमान तापमानात काहीशी वाढ होवून थंडी कमी जाणवेल.
३-ह्यात भोगी(१३ जानेवारी) अगोदर म्हणजे सोमवार-मंगळवार दि. १२-१३ जानेवारीच्या दोन दिवसात खान्देश नाशिक अ.नगर सांगली सोलापूर जिल्ह्यात ढगाळ वातावरणाची शक्यता जाणवते. तर पुणे सातारा कोल्हापूर अशा ३ जिल्ह्यात ढगाळ वातावरणासहित झालाच तर अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यताही नाकारता येत नाही.
४- वातावरणातील हा बदल कशामुळे ?
उत्तर भारतातील घड्याळ काटा दिशेने वाहणारी प्रत्यावर्ती चक्रीय वारा प्रणालीतून महाराष्ट्रावर सरकली असुन थंडी घेऊन येणारे थंड कोरडे पूर्वीय वाऱ्यांना अडथळा झाला असुन त्या ऐवजी उलट बं. उपसागरातील आर्द्रता युक्त वारे महाराष्ट्रात फेकले जात आहेत. पूर्णतः ठप्प झाले आहेत.
मध्य - महाराष्ट्रातील दहा जिल्ह्यात तर वारे उलट दिशेने म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात काहीशी थंडी कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे
५- थंडी पुन्हा कधी वाढणार?
खरे तर शुक्रवार ९ जानेवारीपासूनच अपेक्षित असलेली महाराष्ट्रातील थंडीतील वाढ आता सद्य प्रणालीतील बदलानुसार मकर-संक्रांती नंतरच अपेक्षा करू या!
इतकेच!