थट्टा-मस्करी जीवावर बेतली... ढकलून दिल्याने तरुणाचा मृत्यू...

Share:
Last updated: 03-Mar-2026

नाशिकरोड, (प्रतिनिधी) ३ मार्च - मित्रांमधील किंवा ओळखीच्या व्यक्तींमधील थट्टा-मस्करी कधी जीवघेणी ठरेल याचा नेम नाही. नाशिकच्या जेलरोड भागात अशीच एक दुर्दैवी घटना घडली आहे. 'कामावर जा' असे मस्करीत म्हटल्याच्या रागातून झालेल्या झटापटीत, एका तरुणाला ढकलून दिल्याने त्याचा रस्ते अपघातात (डोक्याला गंभीर दुखापत होऊन) मृत्यू झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, मृत रघू अनिल फाजगे हा तरुण शनिवारी (दि. २८) सकाळी जेलरोड परिसरातील पाण्याच्या टाकीजवळील एका फुलांच्या दुकानासमोर उभा होता. यावेळी त्याच परिसरात राहणारा संशयित परमेश्वर जाधव उर्फ भाऊ जाधव याने रघूला 'तू कामावर जा' असे मस्करीत टोकले. मात्र, हा सल्ला रघूला आवडला नाही आणि तो संतापून संशयिताच्या अंगावर धावून गेला.

धक्काबुक्कीत बसला काळजाचा ठोका

रघू अंगावर धावून आल्याने स्वतःचा बचाव करण्यासाठी संशयित परमेश्वर जाधव याने त्याला जोरात ढकलून दिले. दुर्दैवाने रघूचा तोल गेला आणि तो थेट डांबरी रस्त्यावर कोसळला. रस्ते कडक असल्याने त्याच्या डोक्याला भीषण मार बसला आणि तो जागीच गंभीर जखमी झाला.

उपचारादरम्यान मृत्यू

घटनेनंतर रघूला तातडीने आडगाव येथील मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, डोक्याची दुखापत गंभीर असल्याने उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे श्रमिकनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांत गुन्हा दाखल

याप्रकरणी मृताची आई माया अनिल फाजगे (४८) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित परमेश्वर जाधव याच्याविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक पंडित अहिरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

नाशिक : मदतीच्या बहाण्याने भामट्याने एटीएम कार्डची आदला बदल करीत महिलेच्या बँक खात्यावर डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत सुमारे ७० हजार ६०० रूपये परस्पर काढून घेण्यात आले असून असून याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुदेशराणी कुलदिप सिंग (मुळ रा.हरियाणा हल्ली जुनी डीसी लाईन क्वार्टर सप्लाय डेपो देवळाली कॅम्प) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सुदेशराणी सिंग या रविवारी (दि.१) सायंकाळच्या सुमारास झेंडा चौकातील सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या एटीएम बुथमध्ये पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांना पाठीमागे उभ्या असलेल्या तरूणाने पैसे काढण्यासाठी मदत केली. भामट्याने सिंग यांच्या एटीएम कार्डची आदला बदल करीत परस्पर वेगवेगळ्या एटीएम बुथ आणि पेट्रोल पंपावरून तब्बल ७० हजार ६०० रूपये काढून घेतले असून याबाबत मोबाईलवर संदेश प्राप्त झाल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. उपनिरीक्षक देवरे तपास करीत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.