देवगिरी बंगल्यावरून मी अजित दादांची चप्पल चोरून... अमोल मिटकरी यांनी सगळं खरं खरं सांगून टाकलं...

Share:
Main Image
Last updated: 29-Jan-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २९ जानेवारी -  "मी भाड्याच्या घरात राहणारा एक सामान्य माणूस होतो. राजकारणाची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती, पण अजितदादांच्या एका फोनने माझं आयुष्य बदललं. त्यांनी मला आमदार केलं, घर दिलं आणि माझा राजकीय जन्म झाला. त्यांच्याबद्दलच्या कृतज्ञतेपोटी मी देवगिरी बंगल्यावरून त्यांची चप्पल चोरून आणली आणि आजही माझ्या घरात तिची पूजा करतो," अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

एका फोनने बदललं नशीब
मिटकरी यांनी आपल्या संघर्षाच्या दिवसांची आठवण करून देताना सांगितले की, सहा वर्षांपूर्वी त्यांना अचानक अजित पवारांचा फोन आला. दादा म्हणाले, 'तुला मी आमदार करणार आहे, तू तुझी कागदपत्रे घेऊन ये.' त्यावेळी मिटकरींकडे साधी कागदपत्रेही उपलब्ध नव्हती. मात्र, दादांनी स्वतः वकील देऊन त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करून घेतली आणि एका सामान्य कार्यकर्त्याला थेट विधिमंडळात पोहोचवले.

Advertisement

चप्पल आणि श्रद्धेचा 'तो' किस्सा
अमोल मिटकरी यांनी सांगितलेला चप्पल चोरण्याचा किस्सा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. मिटकरी म्हणाले, "माझ्यासाठी दादा हे केवळ नेते नाहीत तर दैवत आहेत. देवगिरी बंगल्यावर असताना मी त्यांची चप्पल चोरून घरी आणली. ज्या माणसामुळे मला ओळख मिळाली, घर मिळालं, त्यांच्या चरणांची धूळ माझ्या घरात असावी या भावनेतून मी आजही त्या चपलेची पूजा करतो."

ठळक मुद्दे:
सामान्य कार्यकर्ता ते आमदार: भाड्याच्या घरात राहणाऱ्या मिटकरींना पवारांनी दिली आमदारकीची संधी.
कागदपत्रांची जबाबदारीही दादांचीच: स्वतः वकील देऊन मिटकरींच्या उमेदवारीचा मार्ग केला मोकळा.
राजकीय पुनर्जन्म: मिटकरींच्या मते, त्यांच्या राजकीय अस्तित्वाचे पूर्ण श्रेय अजित पवारांनाच जाते.
अजित पवारांच्या नेतृत्वावर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांशी असलेल्या घट्ट नात्यावर मिटकरींनी टाकलेला हा प्रकाश सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Comments

No comments yet.