नाशिक, (प्रतिनिधी) २७ जानेवारी - 77 वा प्रजासत्ताक दिनाच्या औपचारिक कार्यक्रमात महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणातील विधानामुळे तणावपूर्ण घटना घडली. कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याबद्दल एका महिला वन विभागाच्या कर्मचाऱ्याने त्यांना थेट प्रश्न विचारला, ज्यामुळे कार्यक्रमाचे वातावरण काही काळ गोंधळले.
या प्रसंगात माधवी जाधव या महिला कर्मचाऱ्याने उपस्थितांच्या समोर मंत्री महाजन यांना विचारले की, “लोकशाही आणि संविधानाचा खरे शिल्पकार असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भाषणात का घेतले नाही?” अशी तीव्र तक्रार नोंदवली. त्यांनी म्हटले की, “बाबासाहेबांचे नाव न घेणे ही चूक अत्यंत गंभीर आहे आणि ती देशाच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाच्या अर्थाला विरोधाभासी आहे.” जाधव यांनी म्हटले की, “मला सस्पेंड केलं तरी चालेल, पण मी माफी मागणार नाही.”
याप्रकरणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि पोलिसांनी जाधव यांना नियंत्रणात घेतले.
घटनेनंतर पत्रकारांशी बोलताना गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले की, बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेणे अनावधानाने झाले आणि त्याचा कोणताही हेतू नव्हता. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि म्हणाले की, “मी नेहमीच त्यांच्या योगदानाचे कौतुक करत आलो आहे.”
राजकीय स्तरावरही प्रतिक्रिया उमटल्या आहेत. विरोधकांनी महाजन यांच्यावर टीका केली असून, काही नेत्यांनी या प्रकाराला गंभीर सामाजिक व राजकीय समस्या मानली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते... म्हणून आपण आहोत !
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जपणे हा भाजपचा संस्कार आहे. आंबेडकरी विचारांचा कार्यकर्ता म्हणून मी स्वतः सलग ४० वर्षांपासून दरवर्षी आंबेडकर जयंतीला ट्रॅक्टर चालवतो, लेझीम खेळतो. आंबेडकरी विचार आमच्या केवळ भाषणात… pic.twitter.com/qNuZ3BcbOy