गिरीश महाजनांच्या जळगावात काय घडलं? १७ मजली महापालिकेवर झेंडा कुणाचा?

Share:
Main Image
Last updated: 16-Jan-2026

जळगाव, (प्रतिनिधी) १६ जानेवारी - खान्देशातील सर्वात महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या महायुतीने ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. एकूण ७५ जागांपैकी तब्बल ७० जागांवर महायुतीने आपले वर्चस्व निर्माण केले असून, जळगाव महापालिकेवर पुन्हा एकदा महायुतीचा भगवा आणि कमळ फडकत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या विजयामुळे राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या या लढतीत भाजपचे 'संकटमोचक' गिरीश महाजन यांची रणनीती पुन्हा एकदा यशस्वी ठरली आहे.

निवडणुकीपूर्वीच विजयाचा शंखनाद यंदाची निवडणूक महायुतीसाठी सुरुवातीपासूनच सकारात्मक होती. ७५ पैकी १२ उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने मतदानापूर्वीच महायुतीने विजयाचा पाया रचला होता. यामध्ये भाजपचे ६ आणि शिवसेना शिंदे गटाचे ६ उमेदवार बिनविरोध विजयी झाले होते. आज झालेल्या मतमोजणीत उर्वरित ६३ जागांपैकी ५८ हून अधिक जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे.

पक्षीय बलाबल (ताज्या कलानुसार):

भाजप: ४६ (आघाडीवर/विजयी)

शिवसेना (एकनाथ शिंदे गट): २४

शिवसेना (ठाकरे गट): ०५

राष्ट्रवादी (दोन्ही गट) व इतर: शून्य

तुरुंगातून विजय: 'कोल्हे' पॅटर्नची चर्चा या निवडणुकीतील सर्वात गाजलेला निकाल म्हणजे ललित कोल्हे यांचा विजय. कारागृहात असूनही ललित कोल्हे यांनी प्रभागातून विजय खेचून आणला. केवळ ललित कोल्हेच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबातील सिंधुताई कोल्हे आणि पियुष ललित कोल्हे या तिघांनीही विजय मिळवल्याने जळगावात 'कोल्हे पॅटर्न'ची जोरदार चर्चा सुरू आहे.

प्रमुख विजयी उमेदवार:

भाजप: राजेंद्र घुगे पाटील (जळगावातील पहिला निकाल), उज्ज्वला बेंडाळे, दीपमाला काळे, विशाल भोळे, विरेन खडके, अंकिता पंकज पाटील.

शिंदेसेना: गौरव सोनवणे, सागर सोनवणे, मनोज चौधरी, प्रतिभा देशमुख.

ठाकरे गट: रशीद मामू यांनी विजय मिळवून ठाकरे गटाचे अस्तित्व टिकवून ठेवले आहे.

विरोधकांचा सुपडा साफ राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना (अजित पवार आणि शरद पवार) या निवडणुकीत मोठे अपयश आले आहे. अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा धक्का बसला असून, जळगाव शहरावर भाजप आणि शिंदेसेनेने आपली मजबूत पकड पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

विकासाच्या मुद्द्यावर शिक्कामोर्तब "हा विजय जळगावच्या जनतेने विकासावर टाकलेला विश्वास आहे," अशी प्रतिक्रिया महायुतीच्या नेत्यांनी दिली आहे. शहराचा प्रलंबित अमृत प्रकल्प, रस्ते आणि स्वच्छतेच्या मुद्द्यांवर महायुतीने दिलेली आश्वासने मतदारांना भावल्याचे निकालावरून स्पष्ट होत आहे.

Comments

No comments yet.