ठाणेदार कोण? ठाणे महापालिकेतील विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी वाचा एका क्लिकवर

Share:
Main Image
Last updated: 16-Jan-2026

ठाणे, (प्रतिनिधी) १६ जानेवारी - ठाणे हा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला राहिला आहे. या मनपा निवडणुकीत ठाण्यात भाजप-शिवसेना युती आणि ठाकरे बंधू यांच्यात सामना रंगला होता. ठाणे महानगरपालिकेत सरासरी 55.59 टक्के मतदान झाले. 

ठाणे महापालिका निवडणुकीचा सर्व जागांवरील निकाल अजूनही जाहीर झालेला नाही. सायंकाळी पाच वाजेपर्यंत १३१ पैकी ५२ जागांवरील निकाल जाहीर झाले आहेत. त्यात एकनाथ शिंदे यांनी जोरदार मुसंडी मारली असल्याचे दिसत आहे. भाजपा-सेना युतीला मोठे यश ठाण्यात मिळाले आहे. दोन्ही पक्षांना ५२ पैकी ३६ जागा मिळाल्या आहेत. तर उद्धवसेना आणि मनसेची निराशा झाली आहे. 

ठाणे महापालिका निवडणुकीत जाहीर झालेल्या ५२ जागांपैकी शिंदेसेनेने २४ जागा जिंकल्या आहेत. तर भाजपाला १२ जागा जिंकता आल्या आहेत. 

ठाणे महानगरपालिकेवर 30 वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे. आनंद दिघे यांच्या काळापासून ठाणे महानगरपालिका हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. ठाणे महानगरपालिका म्हणजे शिवसेना हे अविभाज्य समीकरण राहिले आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेत यंदा कोणाचा झेंडा फडकणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

विजयी उमेदवार

ठाणे महापालिका निवडणूक विजयी उमेदवार

प्रभाग १ 

अ - सिद्धार्थ ओवळेकर, शिंदे सेना 

ब - अनिता ठाकूर, भाजप

क - नम्रता घरत, शिंदेसेना

ड - विक्रांत तांडेल, शिंदेसेना

प्रभाग २

अ - मनोहर डुंबरे, भाजप

ब - विकास पाटील, भाजप

क - कमल चौधरी, भाजप

ड - अर्चना मणेरा, भाजप

प्रभाग ६ 

अ - वनिता घोगरे, शिंदेसेना

ब - सरिता ठाकूर, शिंदेसेना

क - प्रशांत जाधव, शिंदेसेना 

ड - हणमंत जगदाळे, शिंदेसेना

प्रभाग ९

अ - अनिता गौरी, शिंदेसेना

ब - विजया लासे, शिंदेसेना 
 
क - गणेश कांबळे, शिंदेसेना

ड - अभिजित पवार, राष्ट्रवादी (शरद पवार)

प्रभाग १० 

अ - नजीब मुल्ला, राष्ट्रवादी (अजित पवार गट)

ब - पूनम माळी, राष्ट्रवादी (अजित पवार गट)

क - वहिदा खान, राष्ट्रवादी (अजित पवार गट)

ड - सुहास देसाई, राष्ट्रवादी (अजित पवार गट)

प्रभाग ११ 

अ - दीपक जाधव, भाजपा

ब - शुचिता पाटणकर, भाजपा

क - नंदा पाटील, भाजपा

ड - कृष्णा पाटील, भाजपा

प्रभाग १३
 
अ - शहाजी खुस्पे, उद्धव सेना

ब - निर्मला कणसे, शिंदेसेना

क - वर्षा शेलार, शिंदेसेना

ड - अनिल भोर, शिंदेसेना

प्रभाग १९ 

अ - मीनल संखे, शिंदेसेना

ब - नम्रता भोसले, शिंदेसेना

क - विकास रेपाळे, शिंदेसेना

ड - राजेंद्र फाटक, शिंदेसेना

प्रभाग २० 

अ - मालती पाटील, शिंदेसेना

ब - शर्मिला गायकवाड, शिंदेसेना

क - नम्रता पामनानी, शिंदेसेना

ड - भरत चव्हाण, भाजपा

प्रभाग २१

अ - संजय वाघुले, भाजपा

ब - प्रतिभा मढवी, भाजपा

क - मृणाल पेंडसे, भाजपा

ड - सुनेश जोशी, भाजपा

प्रभाग २७

अ - शैलेश पाटील, शिंदेसेना

ब - आदेश भगत, शिंदेसेना

क - स्नेहा  पाटील, शिंदेसेना

ड - दीपाली भगत, शिंदेसेना 

प्रभाग ३०

अ - नफीस अन्सारी, एमआयएम

ब - सहार युनूस शेख, एमआयएम

क - शेख सुलताना अब्दुल मन्नान, एमआयएम

ड - डोंगरे शोहेब फरीद, एमआयएम

 

(अपडेट निकाल पाहण्यासाठी या पेजला रिफ्रेश करावे)

Comments

No comments yet.