बिनविरोध निवडीवरील याचिकेवर मुंबई हायकोर्टाने दिला हा निकाल...

Share:
Main Image
Last updated: 14-Jan-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १४ जानेवारी - आगामी महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारांच्या बिनविरोध निवडीला आव्हान देणारी मनसे नेते अविनाश जाधव यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. "निवडणूक प्रक्रिया सुरू असताना अशा प्रकारे हस्तक्षेप करता येणार नाही," असे स्पष्ट करत न्यायालयाने याचिकाकर्त्यांना खडे बोल सुनावले आहेत. यामुळे राज्यातील २९ महापालिकांमध्ये बिनविरोध निवडून आलेल्या ६६ उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला आहे.

याचिकेतील मुख्य मागणी काय होती?

अविनाश जाधव यांनी दाखल केलेल्या याचिकेत प्रामुख्याने 'नोटा' (NOTA) पर्यायाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. "एखाद्या प्रभागात एकच उमेदवार रिंगणात असेल आणि त्याची बिनविरोध निवड होत असेल, तरीही तिथल्या मतदारांना आपला नकार दर्शवण्यासाठी 'नोटा'चा पर्याय उपलब्ध असावा," अशी मागणी करण्यात आली होती. बिनविरोध निवडीमुळे मतदारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत असल्याचा दावा याचिकेत केला होता.

न्यायालयाने काय म्हटले?
सुनावणीदरम्यान न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या विसंगत भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. सुरुवातीला ही याचिका इतर प्रलंबित प्रकरणांशी संबंधित असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र नंतर ती स्वतंत्र असल्याचे स्पष्ट झाल्याने न्यायालयाने ताशेरे ओढले. "न्यायालयात चुकीची विधाने का केली जात आहेत?" असा सवाल करत खंडपीठाने याचिका फेटाळून लावली.

२९ महापालिकांमधील चित्र (बिनविरोध विजयी उमेदवार):
राज्यातील २९ महापालिकांमध्ये एकूण ६६ उमेदवार मतदानापूर्वीच विजयी घोषित झाले आहेत. त्याचे पक्षनिहाय बलाबल खालीलप्रमाणे आहे:
भाजप – ४४
पुणे - मंजुषा नागपुरे आणि श्रीकांत जगताप
कल्याण-डोंबिवली - महेश पाटील, जयेश म्हात्रे, दीपेश म्हात्रे, हर्षदा भोईर, रंजना पेणकर, आसावरी नवरे, मंदा पाटील, विजय पाटील, ज्योती पाटील, रेखा चौधरी आणि मुकुंद पेठणेकर.

शिवसेना (शिंदे गट) – १९
ठाणे - सुखदा मोरे, जयश्री फाटक, जयश्री डेव्हिड, सुलेखा चव्हाण, शीतल ढमाले, एकता भोईर, राम रेपाळे 
कल्याण डोंबिवली - रमेश म्हात्रे, वृषाली जोशी, विश्वनाथ राणे, हर्षल मोरे, ज्योती मराठे, रेश्मा नीचळ 
जळगाव - मनोज चौधरी, प्रतिभा देशमुख, सागर सोनावणे, गौरव सोनावणे, रेखा पाटील, गणेश सोनावणे

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – ०२
इस्लाम पार्टी (मालेगाव) – ०१
माजी आमदार आसिफ शेख यांच्या नेतृत्वाखालील 'इस्लाम पार्टी'च्या मुनिरा शेख
एकूण – ६६

Comments

No comments yet.