पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेबाबत महत्वाचे अपडेट

Share:
Main Image
Last updated: 14-Jan-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १४ जानेवारी - पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. आठवी) २२ फेब्रुवारी २०२६ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे.

या परीक्षेचे प्रवेशपत्र मंगळवार १३ जानेवारी २०२६  रोजी संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्राची प्रिंट काढून तात्काळ सर्व परीक्षार्थ्यांना वितरित करावी. तसेच सर्व परीक्षार्थी आणि पालक यांनी मुख्याध्यापकांकडून प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.

Comments

No comments yet.