पुणे, (प्रतिनिधी) १४ जानेवारी - 'शासकीय सहकार व लेखा पदविका' (जी.डी.सी.अॅण्ड ए.) आणि 'सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र' (सी.एच.एम.) या परीक्षांचे आयोजन दिनांक २६, २७ व २८ मे २०२६ रोजी करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी उमेदवारांना दि. ०९ जानेवारी २०२६ ते २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत केवळ ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करता येणार असल्याची माहिती जीडीसी अँड ए बोर्डच्या सचिवांनी दिली आहे.
उमेदवारांनी https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन स्वतःचा 'User ID' आणि 'Password' तयार करावा.
परीक्षेसाठी आवश्यक अर्हता, अनुभव, कागदपत्रे, परीक्षा केंद्र, शुल्क, अभ्यासक्रम आणि अटी-शर्तींची सविस्तर माहिती https://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. संकेतस्थळावरील 'महत्त्वाचे दुवे' या विभागातील 'जी.डी.सी.ऍण्ड ए. मंडळ' या लिंकवर क्लिक केल्यास सर्व तपशील मिळतील.