प्रभाग २४ मध्ये 'घड्याळ' गजर... मतदारांचा वाढत्या पाठिंब्याने अमर वझरे यांच्या विजयाची लाट...

Share:
Main Image
Last updated: 13-Jan-2026

 

नाशिक, (प्रतिनिधी) दि. १३ जानेवारी २०२६ - नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक २४ मधून निवडणूक रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार अमर श्रीराम वझरे यांनी आपल्या झंझावाती प्रचाराने विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात वझरे यांना मिळणारा जनसमुदाय आणि महिला-तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, प्रभागात 'अमर वझरे' नावाचे वादळ निर्माण झाले असून त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

 

अमर वझरे यांनी केवळ निवडणुकीपुरता संपर्क न ठेवता, गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागातील सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिले आहे. रस्ते, पाण्याचा प्रश्न, आणि ड्रेनेज लाईन यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. "आपल्या हक्काचा आणि हाकेला धावून येणारा माणूस" अशी त्यांची प्रतिमा असल्याने मतदारांचा ओढा त्यांच्याकडे वाढला आहे.

 

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी चैतन्याचे वातावरण
आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अमर वझरे यांच्या समर्थकांनी प्रभागात पदयात्रा काढली. यावेळी ठिकठिकाणी त्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. सोशल मीडियापासून ते गल्लीबोळातील चर्चेपर्यंत सध्या वझरे यांचेच नाव आघाडीवर आहे. सुशिक्षित आणि सुसंस्कृत चेहरा ही त्यांची जमेची बाजू ठरत आहे.

 

मतदारांना साद
प्रभाग २४ च्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी 'घड्याळ'या चिन्हासमोरील बटण दाबून अमर श्रीराम वझरे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मित्रपक्षांच्या वतीने करण्यात आले आहे.

विकासाचा स्पष्ट 'रोडमॅप'
प्रचारादरम्यान वझरे यांनी मांडलेला विकासाचा अजेंडा मतदारांना भावला आहे. यामध्ये प्रामुख्याने:

सुरक्षित प्रभाग: सीसीटीव्ही कॅमेरे आणि हायमास्ट दिवे बसवण्यावर भर.

आरोग्य सुविधा: प्रभागात सुसज्ज दवाखाना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र.

युवा सक्षमीकरण: सुशिक्षित बेरोजगारांसाठी कौशल्य विकास केंद्र आणि सुसज्ज वाचनालय.

उद्याने, प्रभागाचे सुशोभिकरण, क्रीडांगण

 

 "मी या मातीतील कार्यकर्ता आहे. सत्ता मिळवणे हा माझा उद्देश नसून, माझ्या प्रभागाला शहरात 'मॉडेल प्रभाग' म्हणून विकसित करणे हे माझे स्वप्न आहे. मतदारांनी मला दिलेला आशीर्वाद मी कामाच्या रूपाने सव्याज परत करेन."

— अमर श्रीराम वझरे, उमेदवार,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

 

 

Comments

No comments yet.