नाशिकमध्ये या दोन कंपन्या करणार तब्बल ३८०० कोटींची गुंतवणूक...

Share:
Main Image
Last updated: 13-Jan-2026

 

नाशिक, (प्रतिनिधी) दि. १३ जानेवारी २०२६ -  गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या सिन्नर येथील १,३५० मेगावॅट क्षमतेच्या औष्णिक विद्युत प्रकल्पाला  अखेर संजीवनी मिळाली आहे. देशातील आघाडीची सार्वजनिक वीज कंपनी 'एनटीपीसी' आणि महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी (महाजेनको) यांनी या प्रकल्पाच्या अधिग्रहणासाठी 'शेअरहोल्डर ॲग्रीमेंट'वर स्वाक्षरी केली आहे. या करारामुळे नाशिक जिल्ह्यासह राज्याच्या वीज निर्मितीला मोठे बळ मिळणार आहे.

 

दोन्ही कंपन्यांची ५०-५० टक्के भागीदारी

या ऐतिहासिक करारानुसार, एनटीपीसी आणि महाजेनको या दोन्ही कंपन्यांचा या प्रकल्पात प्रत्येकी ५० टक्के हिस्सा असणार आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने यापूर्वीच ३,८०० कोटी रुपयांच्या 'रिझोल्यूशन प्लॅन'ला मंजुरी दिली होती. त्यानंतर आता दोन्ही कंपन्यांनी प्रत्यक्ष प्रक्रियेला वेग दिला आहे.

 

सिन्नरसाठी विकासाची मोठी संधी

रतन इंडिया नाशिक पॉवर लिमिटेडचा  हा प्रकल्प विविध कारणांमुळे बंद होता. मात्र, आता केंद्र आणि राज्याच्या दोन मोठ्या संस्थांनी एकत्र येऊन हा प्रकल्प चालवण्याचा निर्णय घेतल्याने सिन्नर परिसरातील औद्योगिक आणि आर्थिक विकासाला पुन्हा गती मिळणार आहे. या प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधीही उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

 

राज्याची विजेची गरज होणार पूर्ण

एनटीपीसीचा तांत्रिक अनुभव आणि महाजेनकोचा स्थानिक पाठिंबा यामुळे हा प्रकल्प आता पूर्ण क्षमतेने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वाढत्या उन्हाळ्यामुळे आणि औद्योगिक वापरामुळे विजेची मागणी वाढत असताना, १३५० मेगावॅटचा हा प्रकल्प राज्याच्या ऊर्जा क्षेत्रात मोलाची भर घालणार आहे.

 

प्रकल्पाची वैशिष्ट्ये:

एकूण क्षमता:,३५० मेगावॅट.

यूनिट्स: २७० मेगावॅट क्षमतेचे एकूण ५ संच

,८०० कोटींची गुंतवणूक: एनसीएलटीच्या मान्यतेनंतर अधिग्रहणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात.

संयुक्त उपक्रम: केंद्र  आणि राज्य  पहिल्यांदाच अशा मोठ्या प्रकल्पासाठी एकत्र.

ऊर्जा संकट दूर होणार: नाशिक जिल्ह्यासह राज्यात हा वीज प्रकल्प 'गेम चेंजर' ठरणार.

Comments

No comments yet.