नशिक मनपा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होत असताना 'राष्ट्रवादी'चे स्टार प्रचारक समीर भुजबळ म्हणाले...

Share:
Main Image
Last updated: 13-Jan-2026

 

नाशिक, (प्रतिनिधी) दि.१३ जानेवारी २०२६:- "येणाऱ्या काळात नाशिकचा चौफेर विकास साधण्यासाठी आणि शहराला प्रगतीची नवी दिशा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशिवसेना व रिपब्लिकन सेना युती कटिबद्ध आहे. शिक्षणआरोग्य आणि पायाभूत सुविधांमध्ये आमूलाग्र बदल घडवून नाशिकला विकासाची नवी भरारी घ्यायची आहे," असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक आणि माजी खासदार समीर भुजबळ यांनी व्यक्त केला. नाशिक महानगरपालिका निवडणुकीत युती उमेदवारांच्या प्रचाराची सांगता करताना त्यांनी मतदारांशी संवाद साधला.

 

हरित नाशिकचे व्हिजन

माजी खासदार समीर भुजबळ यांनी नाशिकच्या भविष्यासाठी आपले व्हिजन मांडताना सांगितले कीरस्तेपाणी आणि वीज यांसारख्या नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर पुन्हा तक्रार करण्याची वेळ येऊ नयेअसे चित्र आपल्याला निर्माण करायचे आहे. केवळ मूलभूत सुविधाच नव्हेतर पर्यावरणपर्यटनस्वच्छतासाहित्य-संस्कृतीक्रीडा आणि महिला - बालकल्याण अशा सर्वच क्षेत्रांत नाशिकला अग्रस्थानी नेण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

 

सिंहस्थ कुंभमेळ्याचे आव्हान आणि विकास

आगामी सिंहस्थ कुंभमेळा ही नाशिकसाठी मोठी संधी आहे. शहराच्या विकासाची हीच ती वेळ असून,नाशिकची आंतरराष्ट्रीय ओळख अधिक प्रबळ करण्यासाठी योग्य निर्णयाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. "नाशिकची भविष्यातील भरारी लक्षात घेऊन सुजाण मतदार योग्य तो निर्णय घेतीलयाची मला खात्री आहे," असेही माजी खासदार समीर भुजबळ म्हणाले.

 

महायुतीच्या विजयाचा विश्वास

यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,शिवसेना आणि रिपब्लिकन सेना युतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानावेळी 'घड्याळ'व धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटण दाबून उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावेजेणेकरून विजयी उमेदवारांसह प्रत्यक्ष कामाला गतीने सुरुवात करता येईलअसे आवाहन त्यांनी नाशिककरांना केले.

मंत्री छगन भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शन व संकल्पनेतून नाशकात साकारलेल्या प्रकल्पांची उत्तम देखभाल आणि नवीन प्रकल्प साकारणे यासाठी उत्साही आणि सर्वोत्तम व्यक्तीची गरज आहे. सुजाण नाशिककर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शिवसेना-रिपब्लिकन सेना युतीची निवड करतीलअशी मला खात्री आहे.

- माजी खासदार समीर भुजबळस्टार प्रचारकराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

 

Comments

No comments yet.