सुट्टीत गावी जाणे होणार सोपे... भारतीय रेल्वेकडून विशेष उन्हाळी गाड्यांची घोषणा... बघा, तुम्हाला कसा होणार फायदा...

Share:
Main Image
Last updated: 22-Apr-2026

नवी दिल्ली, (प्रतिनिधी) २२ एप्रिल - उन्हाळी सुट्ट्यांच्या हंगामात पर्यटनासाठी आणि गावी जाणाऱ्या प्रवाशांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने कंबर कसली आहे. प्रवाशांना सुखद आणि आरामदायी प्रवास मिळावा यासाठी रेल्वेने १५ एप्रिल ते १५ जुलै २०२६ या कालावधीत एकूण ९०८ विशेष रेल्वे गाड्यांच्या १८,२६२ फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

वेळेपूर्वीच नियोजनाची संधी
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मंजूर करण्यात आलेल्या ९०८ गाड्यांपैकी ६६० गाड्यांची अधिकृत सूचना आधीच जारी करण्यात आली आहे. यामध्ये ११,२९४ फेऱ्यांचा समावेश आहे. यामुळे प्रवाशांना शेवटच्या क्षणी होणारी धावपळ टाळून वेळेत आरक्षण (Reservation) करणे आणि प्रवासाचे नियोजन करणे शक्य झाले आहे. सण-उत्सव आणि सुट्ट्यांच्या काळात होणारी गर्दी नियंत्रित करण्यासाठी रेल्वेने हा सक्रिय दृष्टिकोन स्वीकारला आहे.

विभागांनुसार विशेष गाड्यांचे जाळे:
रेल्वेने प्रादेशिक संपर्क लक्षात घेऊन विभागनिहार गाड्यांचे नियोजन केले आहे:
पश्चिम रेल्वे (WR): १०६ गाड्यांना मंजुरी (२,०७८ फेऱ्या). यातील ९२ गाड्यांची सूचना प्रसिद्ध.
मध्य रेल्वे (CR): ७४ गाड्यांना मंजुरी (३,०८२ फेऱ्या). यातील ७० गाड्यांची सूचना प्रसिद्ध.
दक्षिण रेल्वे (SR): ७२ गाड्यांना मंजुरी (५५८ फेऱ्या). यातील ३८ गाड्यांची सूचना प्रसिद्ध.

Advertisement

?s=20

प्रवाशांच्या सुविधेला प्राधान्य
ज्या मार्गांवर प्रवाशांची मागणी सर्वाधिक आहे, अशा मार्गांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात विशेष गाड्या सोडल्यामुळे नियमित गाड्यांवरील ताण कमी होईल आणि प्रवाशांना कमीत कमी त्रासात प्रवास करता येईल. "प्रवाशांची सोय आणि सुरक्षितता हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे," असे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या विशेष गाड्यांच्या नियोजनामुळे उन्हाळ्याच्या काळात प्रवाशांना हक्काची जागा मिळणे सोपे होणार असून रेल्वेच्या महसुलातही मोठी वाढ अपेक्षित आहे.

?s=20

Comments

No comments yet.