भोंदू खरातच्या संपर्कात सर्वाधिक कोण असायचे? अंजली दमानियांकडून बड्या राजकारण्यांची आणि अधिकाऱ्यांची यादी जाहीर...

Share:
Main Image
Last updated: 15-Apr-2026

मुंबई, (प्रतिनिधी) १५ एप्रिल - सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अशोक खरात आणि राजकारण्यांच्या संबंधांबाबत गंभीर आरोप केले आहेत. १७ जानेवारी रोजी अजित पवार यांच्या पुण्यातील घराबाहेर जेव्हा 'भानामती'चा (Black Magic) प्रकार घडला, त्याच वेळी अशोक खरातने ठाण्यातील एका हॉटेलमध्ये बसून अवघ्या ३४ सेकंदात पैशांचे ६ मोठे व्यवहार केल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे. या सर्व प्रकरणाचा अजित पवारांच्या अपघाताशी काही संबंध आहे का, याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

कोट्यवधींचे संशयास्पद व्यवहार
दमानिया यांनी 'समता प्रतिष्ठान'मधील भ्रष्टाचारावर बोट ठेवले आहे. २७ ते ३१ जानेवारी या पाच दिवसांच्या कालावधीत या प्रतिष्ठानमध्ये ५ कोटी ३३ लाखांचे अफाट व्यवहार झाले आहेत. "हे पैसे कोणी दिले आणि कशासाठी वापरले गेले, याची आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) सखोल चौकशी करायला हवी," असे दमानिया म्हणाल्या.

Advertisement

रुपाली चाकणकरांसोबत १७७ वेळा संपर्क?
अशोक खरातच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींची 'कॉल लिस्ट' सादर करत दमानिया यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर थेट निशाणा साधला. "चाकणकर यांनी खरातला १७७ वेळा कॉल केला असून, एकदा तर तब्बल २२ मिनिटे चर्चा झाली आहे. खरातशी सर्वाधिक बोलणाऱ्या पहिल्या १० व्यक्तींमध्ये चाकणकर दुसऱ्या क्रमांकावर आहेत," असा खळबळजनक दावा त्यांनी केला.

बड्या नेत्यांची नावे जाहीर
खरातच्या संपर्कात अनेक बडे राजकारणी आणि प्रशासकीय अधिकारी असल्याचे सांगत दमानिया यांनी एक यादीच सादर केली. यामध्ये:
राजकारणी: एकनाथ शिंदे, सुनील तटकरे, जयंत पाटील, चंद्रकांत पाटील, नितीन पवार, उदय सांगळे, दादा भुसे यांचे पीए, विखे पाटील यांचे पीए.
अधिकारी: दीपक लोंढे, बाळासाहेब बोराडे, सचिन चुंबाळे यांच्यासह अनेक नावांचा समावेश आहे.

कल्पना खरात सध्या फरार असून, पोलिसांनी त्यांना जाणीवपूर्वक पळून जाऊ दिले का? असा संशयही दमानिया यांनी व्यक्त केला आहे.

Advertisement

Comments

No comments yet.