विंचूर लासलगावसह १६ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा वीजपुरवठा सुरळीत .... मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार निर्णय

Share:
Main Image
Last updated: 07-Apr-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ७ एप्रिल - आठ दिवसांपासून विंचूर, लासलगावसह १६ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा थकित वीजबिलामुळे बंद करण्यात आला होता. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार नाशिक येथील कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत वीज पुरवठा पुन्हा सुरळीत करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

Advertisement

थकित वीजबिलामुळे गेल्या आठ दिवसांपासून विंचूर लासलगाव सह १६ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा खंडित करण्यात आल्याने पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना केल्या होत्या. तसेच याबाबत संबंधित समिती व अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन तातडीने हा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना केल्या होता. त्यानुसार मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक कार्यालयात पाणी पुरवठा समिती व अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत विद्युत पुरवठा सुरळीत करण्याबाबत निर्णय झाला. त्यानंतर लगेचच विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला असून उद्या पासून पाणी पुरवठा सुरळीत सुरू होणार आहे.

यावेळी योजनेचे अध्यक्ष जयदत्त होळकर, मंत्री छगन भुजबळ यांचे विशेष कार्य अधिकारी हरीश भामरे,  गटविकास अधिकारी नम्रता जगताप, महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेश थूल, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर व्ही महाजन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता स्नेहांकुश चिकोडे,  उपअभियंता सूर्यवंशी, भावे, शिंदे, सरपंच सचिन दरेकर, ग्रामविकास अधिकारी बाविस्कर, मगर, शिरसाठ, मराठे, पांडुरंग राऊत, पवन सानप, विलास गोरे, यश पटेल यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

No comments yet.