पुणे विद्यापीठ कुलगुरुंविरुद्ध चतुशृंगी पोलिसांत तक्रार दाखल…

Share:
Main Image
Last updated: 29-Mar-2026

पुणे, (प्रतिनिधी) २९ मार्च - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू कार्यालयातून कौटुंबिक बदनामीचे रचले गेलेले षडयंत्र आणि त्यावरून पोलिसांत तक्रार दाखल करून गेली ३० तास ठिय्या आंदोलन करीत असलेल्या व्यवस्थापन परिषद सदस्य सागर वैद्य यांचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मात्र कुलगुरू सुरेश गोसावी यांच्या विरुद्ध शनिवारी मध्यरात्री वैद्य यांनी चतुशृंगी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

गेली दोन दिवस विद्यापीठाच्या सिनेट बैठक विद्यार्थी प्राध्यापकांचे प्रश्न, गैरकारभार, अनियमितता, ब्लॅकमेलिंग,गुंडगिरी विरुद्ध आंदोलनांनी, चर्चांनी गाजली. सदस्य सागर वैद्य यांच्या कुटुंबियांची सोशल मीडियावर cctv visual वापरून बदनामी करण्याचा कट कुलगुरू कार्यालयात चर्चिला गेल्याचा मुद्दावरून सभागृहात रणकंदन झाले. कुलगुरूंच्या निलंबनाची मागणी करत वैद्य यांनी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले. या विषयी सागर वैद्य यांनी शनिवारी मध्यरात्री कुलगुरू सुरेश गोसावी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. यावेळी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य बागेश्री मंथाळकर, सिनेट सदस्य शंतनू लामधाडे, कृष्णा भंडाळकर, राहुल पाखरे, अमोल घोलप, संजय कीर्तने आदींसह शेकडो विद्यार्थी हजर होते. सदर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

Advertisement

सदर प्रकारामुळे राज्यभरातील शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली. पुणे विद्यापीठातील अनेक सिनेट सदस्यांनी विद्यापीठाच्या जेवणावर बहिष्कार घातला. शेकडो लोकांनी पाठिंबा देत भेटी दिल्या. प्रकरणाची दखल मुख्यमंत्री, उच्च शिक्षणमंत्री यांनी आढावा घेतला. 

दुपारी शिक्षणमंत्री यांनी फोनवरून सागर वैद्य यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्री यांनी विद्यापीठातील प्रकार गांभीर्याने घेतले आहे. लवकरच योग्य ती कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले. तसेच, कार्यकर्ते म्हणून आपल्या प्रकृतीची काळजी वाटत असल्याने आपण आंदोलन स्थगित करावे अशी सूचना केली. त्यानुसार प्रकुलगुरू डॉ. पराग काळकर, राजेंद्र विखे पाटील यांनी आंदोलनस्थळी येवून वैद्य यांचेशी चर्चा केली. संध्याकाळी प्रसेनजित फडणवीस, बागेश्री मंथाळकर, सिनेट सदस्य, विद्यार्थी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत वैद्य यांनी संध्याकाळी आंदोलन स्थगित केले. झाल्या प्रकाराने राज्यातील विद्यार्थी संघटना, शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Comments

No comments yet.