आखाती देशातील विमानसेवा बंद की सुरू?

Share:
Main Image
Last updated: 08-Mar-2026

मुंबई, (प्रतिनिधी) ८ मार्च - आखाती देशातील युद्ध सदृश परिस्थितीमुळे मागील काही दिवस प्रलंबित झालेली विमान सेवा व विमान उड्डाण सुरू झाली आहेत.व्यावसायिक प्रवासी विमान उड्डाणे नियमित सुरू झाल्याने  भारतीय नागरिक, पर्यटक व प्रवासी भारतात येण्यासाठी आवश्यकतेनुसार थेट तिकीट आरक्षित करू शकतात, असे परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने कळविण्यात आले  आहे.

आखाती विविध देशात अडकलेल्या प्रवाशांना याबाबत सहाय्य व अधिक माहितीसाठी असल्यास संबंधित देशातील भारतीय दूतावास अथवा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयास संपर्क साधावा, याबाबत माहिती महाराष्ट्र शासनाच्या  राज्य आपत्तकालीन कार्य केंद्राच्या (SEOC)वतीने देण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्व अडकलेल्या नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, घाबरून जाऊ नये किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये. शासन, भारत सरकारचे दूतावास आणि स्थानिक स्वयंसेवक यांच्यात समन्वय सुरू असून प्रत्येक नागरिकाला सुरक्षितपणे परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Advertisement

‘सहायता’ पोर्टलवर अथवा https://geospatial.mahaseoc.in/Sahayata_gulf/  या लिंकवर जाऊन संबंधित नागरिकांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी आवश्यक माहिती भरावी, असे आवाहन मंत्री महाजन यांनी केले आहे. या माध्यमातून शासनाला अडकलेल्या व्यक्तींचे स्थान, संपर्क क्रमांक, प्रवासाचा तपशील इत्यादी माहिती तात्काळ उपलब्ध होणार असून मदतकार्य अधिक प्रभावीपणे राबविणे शक्य होईल.

अडकलेल्या नागरिकांनी आवश्यक माहिती नोंदवण्यासाठी आणि मदतीसाठी महा हेल्पलाईन शी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून, उपलब्ध प्रत्येक फ्लाइटमध्ये जास्तीत जास्त नागरिकांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Comments

No comments yet.