आखाती देशात अडकलेल्या नाशिक जिल्ह्यातील नागरिकांसाठी...

Share:
Main Image
Last updated: 04-Mar-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ४ मार्च -  मध्य पूर्व आणि गल्फ (आखाती) देशामंध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीत जिल्ह्यातील अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि मदतीसाठी जिल्हा प्रशासन, नाशिक मार्फत अत्यावश्यक सूचना जारी केल्या आहेत. त्या सूचनांचे नागरिकांनी व त्यांच्या कुटुंबियांनी पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नाशिक चे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी केले आहे.

अशा आहेत सूचना
सुरक्षितता: सुरक्षित ठिकाणी राहावे आणि अनावश्यक हालचाल टाळावी.
अधिकृत सूचना: भारतीय दुतावास (Embassy) आणि कॉन्स्युलेटने वेळोवेळी दिलेल्या अधिकृत सूचनांचे काटेकोर पालन करावे.
संपर्क: आपले वर्तमान लोकेशन आणि सद्यस्थिती कुटुंबीयांना सतत कळवत रहावी.
दक्षता: मोबाईल कायम चार्ज ठेवा आणि प्रवासाची तसे ओळखीची सर्व आवश्यक कागदपत्रे स्वत:जवळ सुरक्षित ठेवावीत
अफवा टाळा: सोशल मिडियावर कोणत्याही प्रकारच्या अफवा, चुकीची माहिती किंवा अप्रमाणित संदेश पसरू नयेत.
दुतावासात नोंदणी: आपल्या जवळच्या भारतीय दुतावासाकडे तातडीने नोंदणी (Registration) करणे अत्यावश्यक आहे.

गुगल फॉर्मद्वारे (Google Form) माहिती संकलन 
नाशिक जिल्ह्यातील जे नागरिक गल्फ देशांमध्ये अडकले आहेत. त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या गुगल फॉर्मवर अडकलेल्या व्यक्तीची संपूर्ण व अचूक माहिती त्वरीत भरावी. यामुळे जिल्हा  प्रशासनाला राज्य व केंद्र शासनामार्फत बचावकार्यासाठी योग्य तो समन्वय साधण्यास मदत होईल.

Advertisement

24/7 आपत्कालीन संपर्क क्रमांक (Helpline)
आपत्कालिन परिस्थितीत संपर्क साधण्यासाठी  नागरिकांनी  व त्यांच्या नातेवाईकांनी खालील हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करावा.

जिल्हा आपत्ती व्यावस्थापन (DEOC) नाशिक
दूरध्वनी क्रमांक: 0253-2317151
मोबाईल क्रमांक: 9767649555

राज्य आपत्कालीन प्रतिसाद केंद्र (SEOC) महाराष्ट्र शासन
टोल फ्री: 1077
मोबाईल: +91-9321587143
दूरध्वनी: 022-22027990
ईमेल: controlroom@gov.in

जिल्हा प्रशासन, राज्य शासन आणि परराष्ट्र मंत्रालय (MEA) परेदशातील नागरिकांच्या सुरक्षिततेवर लक्ष ठेवून असून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयन्त सुरू आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे, असेही आवाहन राजपूत यांनी केले आहे.

Comments

No comments yet.