अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल...

Share:
Last updated: 09-Feb-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ९ फेब्रुवारी - सिडको परिसरातील पवननगर भागात एका अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर अपलोड करून तिची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संशयिताने पीडितेच्या वडिलांनाही हे फोटो पाठवून मानसिक त्रास दिल्याने परिसरात संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ओमकुमार अनंतराव मोरे (रा. एस बँकेजवळ, पवननगर, सिडको) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.

वाढदिवसाच्या बहाण्याने कृत्य
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित ओमकुमार आणि पीडित मुलगी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. गेल्या वर्षी मुलीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संशयिताने तिला आपल्या घरी बोलावले होते. वाढदिवसाचे सेलिब्रेशन सुरू असताना संशयिताने तिचा विनयभंग केला आणि तिचे काही अश्लील फोटो काढले.

धमकी देऊन वारंवार अत्याचार
हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन संशयिताने वेळोवेळी पीडितेला आपल्या घरी बोलावून घेतले. तिथे तिच्यासोबत अश्लील चाळे करत तिचा छळ केला. संशयिताचे मनोबल इतके वाढले की, त्याने हे फोटो थेट मुलीच्या वडिलांच्या मोबाईलवर पाठवले. इतकेच करून न थांबता, त्याने मुलीच्या सोशल मीडिया अकाऊंटचा वापर करून फोटो सार्वजनिक केल्याने पीडितेच्या कुटुंबीयांनी तत्काळ पोलिसांत धाव घेतली.

पोलीस तपास सुरू
या घटनेची गांभीर्याने दखल घेत अंबड पोलिसांनी संशयिताविरुद्ध विविध कलमान्वये आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उंडे करीत आहेत.
पालकांसाठी आवाहन: आपल्या पाल्याच्या सोशल मीडिया वापरावर लक्ष ठेवा आणि अशा प्रकारची कोणतीही धमकी किंवा त्रास होत असल्यास न घाबरता पोलिसांशी संपर्क साधावा.

नाशिक - रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची पोत दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेली. ही घटना  सिडकोतील पांगरे मळा भागात घडली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रजनी सुभाष शेजोळे (रा.मंगलमुर्ती सोसा.जवळ,खांडेमळा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शेजोले रविवारी (दि.८) सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. परिसरातील पांगरे मळ््यातील गणपती मंदिरासमोरून त्या घराकडे पायी जात असतांना दुचाकीवर आलेल्या भामट्याने त्यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची व सुमारे एक लाख रूपये किमतीची सोन्याची पोत ओरबाडून नेली. जमादार दीपक बागूल तपास करीत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.