राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या येवला शहराची कार्यकारिणी बरखास्त...

Share:
Main Image
Last updated: 03-Feb-2026

येवला, (प्रतिनिधी) ३ फेब्रुवारी - येवला शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची विद्यमान कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून, जुन्या व नव्या पदाधिकाऱ्यांचा समतोल साधत लवकरच नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष दत्ता निकम यांनी दिली.

पक्ष संघटना अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून, मतदारसंघाचे भाग्यविधाते ना. छगन  भुजबळ साहेब, माजी खा. समीर भुजबळ, आ पंकज भुजबळ, प्रदेश सरचिटणीस दिलीप अण्णा खैरे यांच्या मार्गदर्शना खाली  या नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून येवला शहरात पक्षाचे संघटन अधिक मजबूत केले जाईल, असे दत्ता निकम यांनी स्पष्ट केले.

Advertisement

शहरातील सर्व समाजघटकांना प्रतिनिधित्व देत, कार्यक्षम, तरुण व अनुभवी पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेली कार्यकारिणी स्थापन करण्यात येणार आहे. आगामी काळात पक्षाच्या कार्यक्रमांना अधिक गती देत, जनतेच्या प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नव्या कार्यकारिणीमुळे येवला शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद अधिक वाढेल आणि पक्ष अधिक संघटित व सक्रिय होईल, असा ठाम विश्वासही दत्ता निकम यांनी यावेळी व्यक्त केला.

Comments

No comments yet.