नाशिक आणि जळगाव आयकर पथकाची या कंपनीवर कारवाई...

Share:
Main Image
Last updated: 27-Jan-2026

नंदुरबार, (प्रतिनिधी) २७ जानेवारी - नाशिक आणि जळगाव येथील आयकर टीडीएस पथकांनी आयकर आयुक्त टीडीएस रेंज नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली 23 जानेवारी 2026 रोजी शिरपूर येथे गोयल ट्रेडिंग कंपनीच्या कार्यालयावर सर्वेक्षण  करुन कारवाई केली, असल्याचे नाशिक आयकर उपायुक्त सदानंद आर कसलू यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Advertisement

आर्थिक वर्ष 2021-22 ते 2023-24 या कालावधीत गोयल ट्रेडिंग कंपनीने 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची खते, बियाणे आणि कीटकनाशके खरेदी केली होती. आयकर कायद्यातील तरतुदींनुसार या खरेदीवर आवश्यक असलेला टीडीएस/टीसीएस कापला गेला नाही आणि तो सरकारी खात्यात जमा करण्यात आला नाही. या गंभीर अनियमिततेमुळे आयकर विभागाच्या टीडीएस अधिकाऱ्यांनी आस्थापनेची सखोल चौकशी केली आणि अखेरीस वजावट करणाऱ्याने कर जमा केला.

आयकर विभागाने स्पष्ट केले आहे की, एकदा टीडीएस कापला की तो ‘सरकारी पैसा’ बनतो आणि त्याचा गैरवापर कोणीही करु नये, कंपन्या, ट्रस्ट, सोसायट्या आणि इतरांनी वेळेवर टीडीएस भरणा आणि टीडीएस/टीसीएस रिर्टन भरण्याचा फॉर्म 26 एएस आणि एआयएसशी नियमित जुळवून घ्यावा. जाणूनबुजून केलेल्या थकबाकीदारांना व्याज, मोठा दंड आणि आयकर कायदा 1961 नुसार लागू असलेल्या खटल्यासारख्या कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, त्यामुळे सर्व संबंधितांनी टीडीएस/टीसीएस तरतुदींचे काटेकोर पालन करण्याचे आणि वेळेवर  टीडीएस/टीसीएस कापून जमा करावे, असेही आवाहन नाशिक आयकर उपायुक्त सदानंद आर कसलू यांनी या शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

Comments

No comments yet.