महापालिकेत तक्रार केली म्हणून...

Share:
Last updated: 23-Jan-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २३ जानेवारी - महापालिकेत तक्रार केल्याच्या वादातून सोडावॉटर विक्री करणाºया व्यावसायीकाने महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार सातपूर कॉलनीत घडला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

संदिप पुंडलीक तायडे (३५ रा.आदिनाथ अपा.सातपूर कॉलनी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित सोडावॉटर विक्रेत्याचे नाव आहे. आनंदछाया बसस्टॉप भागात राहणाऱ्या पिडीतेने याबाबत फिर्याद दिली आहे. संशयित घरासमोर सोडवॉटर विक्रीची गाडी लावत असल्याने पिडीतेने महापालिकेत तक्रार केली होती. या तक्रारीची कुरापत काढून गुरूवारी (दि.२२) दुपारी महिलेस शिवीगाळ केली. यावेळी महिला त्यास समजून सांगण्याचा प्रयत्न करीत असतांना त्याने विनयभंग केला. अधिक तपास हवालदार सुर्यवंशी करीत आहेत.


नाशिक : बसमध्ये चढतांना महिलेच्या पर्समधील सुमारे साडे सहा लाख रूपये किमतीचे अलंकार चोरट्यांनी हातोहात लांबविले. हा प्रकार मेळा बसस्थानकात घडला. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुवर्णा प्रशांत डबरी (रा.मानेक्षानगर रविंद्र हायस्कूल मागे, द्वारका) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. डबरी या गेल्या शनिवारी (दि.१७) सकाळी पुणे येथे जाण्यासाठी मेळा बसस्थानकात गेल्या होत्या. एमएच १२ व्हीएफ ९२०३ या शिवाई बसमध्ये चढत असतांना ही चोरी झाली. बसला गर्दी असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्स मधील मिनी पाकिट चोरून नेले. या पाकिटात सोन्याचे मंगळसुत्र, तोडे व सोनसाखळी असा सुमारे ६ लाख ४० हजार रूपये किमतीचा ऐवज होता. अधिक तपास जमादार नाईक करीत आहेत.

Comments

No comments yet.