हद्दच झाली... पेट्रोल पंपावर थांबलेल्या ट्रकमधूनच डिझेल चोरी...

Share:
Last updated: 23-Jan-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २३ जानेवारी - विश्रांतीसाठी पेट्रोल पंपावर थांबलेल्या मालवाहू अवजड वाहनांमधून चोरट्यांनी डिझेलची चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. शिंदे पळसे ता.जि.नाशिक येथील पठाण पेट्रोल पंपावर हा प्रकार घडला असून, या घटनेत सुमारे ७१ हजार रूपये किमतीचे व साडे सातशे लिटर डिझेलवर भामट्यांनी डल्ला मारला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

सलीम तोलाजी शेख (रा. माझलगाव जि.बिड) या ट्रकचालकाने याबाबत फिर्याद दिली आहे. नाशिक पुणा रोडवरील शिंदे गावात असलेल्या पठाण पेट्रोल पंप परिसरात रात्रीच्या वेळी अनेक लांबरूटचे अवजड वाहने थांबतात. गुरूवारी (दि.२२) मध्यरात्री पुणे येथून नाशिकच्या दिशेने मालट्रक घेऊन निघालेले शेखही विश्रांतीसाठी थांबले असता ही घटना घडली. आपल्या ताब्यातील ट्रक पार्क करून ते चालक कॅबीनमध्ये झोपलेले असतांना पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी ट्रकच्या टॅकमधून डिझेल चोरी केली. यावेळी भामट्यांनी शेजारी पार्क केलेल्या ट्रकमधूनही डिझेल चोरी केली. या तिन्ही वाहनातील सुमारे ७१ हजार रूपये किमतीच्या ७६० लिटर डिझेलवर डल्ला मारला आहे. या गुन्ह्याचा तपास हवालदार पवार करीत आहेत.

Comments

No comments yet.