हळदी कुंकवाच्या कार्यक्रमास जाणाऱ्या महिलेसोबत घडला हा गंभीर प्रकार...

Share:
Last updated: 22-Jan-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २२ जानेवारी - हळदी कुंकवाच्या कार्यक्रमास रस्त्याने जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र दुचाकीस्वार भामट्यांनी हिसकावून नेले. ही घटना पाथर्डी शिवारातील नरहरीनगर भागात घडली. याप्रकरणी इंदनिरानगर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्नेहा दीपक पवार (रा.क्रोमा शोरूम मागे, पाथर्डी फाटा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. स्नेहा पवार या बुधवारी (दि.२१) सायंकाळी आपल्या मैत्रीणीच्या घरी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी जात असतांना ही घटना घडली. आनंदनगर येथील दुर्गा मंदिराजवळ असलेल्या महादेव मंदिरापाठीमागून त्या कॉलनीरोडने पायी जात असतांना दुचाकीवर डबलसिट आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळ््यातील सुमारे ४२ हजार रूपये किमतीचे शॉट मंगळसुत्र हिसकावून नेले. या गुह्याचा तपास हवालदार देवरे करीत आहेत.

Advertisement

आजारपणास कंटाळून वृद्धेने पेटवून घेतले

नाशिक : आजारपणास कंटाळून एका वयोवृध्द महिलेने पेटवून घेतल्याचा धक्कादायक प्रकार टिळकवाडी भागात घडला. या घटनेत गंभीर भाजलेल्या वृध्देचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिनाबाई रंगनाथ ढोले (८२ रा. जेजुरकरवाडी टिळकवाडी शरणपूररोड) असे मृत वृध्देचे नाव आहे. वयोवृध्द मिनाबाई ढोले या दुर्धर आजाराने पिडीत होत्या. उपचार करूनही प्रकृर्तीत सुधारणा होत नसल्याने त्यांनी गेल्या मंगळवारी (दि.२०) सकाळच्या सुमारास आपल्या राहत्या घरी ज्वलनशिल पदार्थ स्व:ताच्या अंगावर ओतून घेत पेटवून घेतले होते. या घटनेत त्या गंभीर भाजल्या होत्या. नातू कैलास ढोले यांनी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले होते. दुसºया दिवशी उपचार सुरू असतांना डॉ. राहूल शेडगे यांनी तपासून त्यांना मृत घोषीत केले. या प्रकरणाचा तपास हवालदार माळोदे करीत आहेत.

Comments

No comments yet.