महापौरांचे आरक्षण जाहीर... बघा, कुठल्या शहरात कुणाला संधी?

Share:
Last updated: 22-Jan-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २२ जानेवारी - राज्यातील 29 महानगरपालिकेतील महापौरपदासाठी आज आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. 29 महापालिका सोडतीसाठी भाजपकडून महामंत्री राजेश शिरवडकर, ठाकरे गटाकडून मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, आमदार मनोज जामसुतकर, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार गटाकडून आनंद परांजपे उपस्थित होते. 

50 टक्के महिला आरक्षणाचा नियम लागू केल्याने राज्यातील 15 महापालिकांवर महिलाराज असणार आहे. तर 14 ठिकाणी सर्वसाधारण वर्गाला संधी मिळणार आहे. महिलांना असलेल्या 50 टक्के आरक्षणानुसार, 4 महापालिकांमध्ये ओबीसी महिला , तर 9 महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण लागू होणार आहे. राज्यातील 29 महानगरपालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान झालं होतं. तर 16 जानेवारीला मतमोजणी झाली होती. कोणत्या महापालिकेत कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालं, वाचा - 

Advertisement

महाराष्ट्रातील 29 महापौरपदांसाठी आरक्षण-
अनुसूचित जमाती - 1 
अनुसूचित जाती - 3 
नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) - 8 
सर्वसाधारण - 17

1. मुंबई -    सर्वसाधारण
2. ठाणे - अनुसूचित जाती (एससी)
3. कल्याण-डोंबिवली    अनुसूचित जमाती- एसटी (पुरुष)
4  नवी मुंबई -  सर्वसाधारण
5. वसई-विरार -  सर्वसाधारण
6.    भिवंडी-निजामपूर -  सर्वसाधारण
7.    मीरा-भाईंदर -   सर्वसाधारण
8.    उल्हासनगर  -  ओबीसी- महिला किंवा पुरूष
9.    पुणे  -  सर्वसाधारण
10.    पिंपरी-चिंचवड  -  सर्वसाधारण
11.    नागपूर -   सर्वसाधारण
12.    अहिल्यानगर -   ओबीसी- महिला
13.    नाशिक -   सर्वसाधारण महिला
14.    छत्रपती संभाजीनगर -   सर्वसाधारण
15.    अकोला -   ओबीसी-महिला
16.    अमरावती -   सर्वसाधारण
17.    लातूर -   अनुसूचित जाती (एससी)- महिला
18.    नांदेड-वाघाळा  -  सर्वसाधारण
19.    चंद्रपूर -   ओबीसी- महिला
20.    धुळे -   सर्वसाधारण
21.    जळगाव -   ओबीसी- महिला
22.    मालेगाव -   सर्वसाधारण
23.    कोल्हापूर -   ओबीसी-महिला किंवा पुरूष
24.    सांगली-मिरज-कुपवाड -   सर्वसाधारण
25.   सोलापूर -   सर्वसाधारण
26.    इचलकरंजी -   ओबीसी- महिला किंवा पुरूष
27.    जालना -   अनुसूचित जाती (एससी)- महिला
28.    पनवेल -   ओबीसी- महिला किंवा पुरूष
29.    परभणी -   सर्वसाधारण

Comments

No comments yet.