रिलायन्स मॉलमधील मोबाईल लांबवले...

Share:
Last updated: 21-Jan-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २१ जानेवारी - मॉलमध्ये विक्रीसाठी ठेवलेले दोन मोबाईल चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार पाथर्डी फाटा भागातील रिलायन्स डिजीटल मॉलमध्ये घडला. या घटनेत लाखाच्या मोबाईलवर भामट्यांनी डल्ला मारला असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मॉलचे व्यवस्थापक दिपक चव्हाण यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सोमवारी (दि.१९) हा प्रकार घडला. खरेदीच्या बहाण्याने मॉलमध्ये दाखल झालेल्या भामट्यांनी काऊंटरवर विक्रीसाठी लावलेला सॅमसंग आणि ओपो कंपनीचे एक लाख ४९८ रूपये किमतीचे दोन मोबाईल चोरून नेले. ही बाब सायंकाळी निदर्शनास आली. हि घटना सीसीटीव्ही यंत्रणेत कैद झाली असून पोलीस चोरट्यांचा माग काढत आहेत. या गुन्ह्याचा तपास हवालदार परदेशी करीत आहेत.

अज्ञात कारणावरून एकाची आत्महत्या 

नाशिक : हिंगणवेढा ता.जि.नाशिक येथील ४० वर्षीय व्यक्तीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. सदर इसमाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विनायक भागूजी धात्रक (रा.मराठी शाळेजवळ, हिंगणवेढा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. धात्रक यांनी मंगळवारी (दि.२०) रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास साडी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच पत्नी रोहिणी धात्रक यांनी त्यांना तात्काळ बिटको रूग्णालयात दाखल केले असता डॉ. व्हिनस पाटील यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. अधिक तपास हवालदार झाडे करीत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.