नवरात्रोत्सवामुळे आठवडी बाजार राहणार बंद... जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश...

Share:
Main Image
Last updated: 12-Oct-2026

 

जळगाव, (प्रतिनिधी) १२ ऑक्टोबर - जिल्ह्यात आगामी नवरात्रोत्सव, तसेच विविध भागांत होणारे बालाजी वहनोत्सव, रथोत्सव आणि पालखी मिरवणुकांदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन कडक पावले उचलत आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील संबंधित ठिकाणचे आठवडी बाजार त्यांच्या नियमित दिवशी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी रोहन घुगे यांनी जारी केले आहेत.

११ ते २६ ऑक्टोबर दरम्यान निर्बंध लागू

आदेशानुसार, दिनांक ११ ते २३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत नवरात्रोत्सव साजरी होत असून, ११ ते २६ ऑक्टोबर दरम्यान चोपडा, धरणगाव, पारोळा, भडगाव आणि मेहुणबारे येथे विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

Advertisement

या उत्सवांच्या काळात दुर्गादेवी विसर्जन मिरवणुका, रथोत्सव व पालखी सोहळ्यांमध्ये भाविकांची व नागरिकांची प्रचंड गर्दी होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रशासनाचे निर्देश आणि व्यापाऱ्यांसाठी पर्यायी व्यवस्था

मुंबई मार्केट अँड फेअर्स ॲक्ट, १८६२ च्या कलम ५ (अ) व ५ (क) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून, ११ ते २६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत चोपडा, धरणगाव, पारोळा, भडगाव, मेहुणबारे आणि जिल्ह्यातील इतर संबंधित ठिकाणचे आठवडी बाजार त्यांच्या नियमित दिवशी भरवण्यास बंदी घालण्यात आली आहे.

तसेच, नागरिक आणि व्यापाऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी संबंधित नगर परिषदा, नगर पंचायती व स्थानिक प्रशासनाने हे आठवडी बाजार नियमित दिवसाऐवजी दुसऱ्या किंवा सोईस्कर पुढील दिवशी भरविण्याबाबत आवश्यक ती पर्यायी कार्यवाही करावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

 

Comments

No comments yet.