मतदार यादीवरील दावे व हरकती... निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय...

Share:
Main Image
Last updated: 12-Oct-2026

 

नाशिक, (प्रतिनिधी) १२ ऑक्टोबर - महाराष्ट्रातील १ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती दाखल करण्याच्या मुदतीत भारत निवडणूक आयोगाने (ECI) वाढ केली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार आता नागरिकांना २६ ऑक्टोबर २०२६ पर्यंत आपले दावे आणि हरकती दाखल करता येणार आहेत.

निवडणूक आयोगाकडून सुधारित वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केलेल्या विशेष विनंतीची दखल घेत भारत निवडणूक आयोगाने १२ ऑक्टोबर २०२६ रोजी अधिसूचना जारी करून ही मुदतवाढ मंजूर केली आहे. यापूर्वी दावे व हरकती दाखल करण्याची अंतिम तारीख १२ ऑक्टोबर होती, ती आता १४ दिवसांनी वाढवून २६ ऑक्टोबर करण्यात आली आहे.

सुधारित वेळापत्रक खालीलप्रमाणे:

Advertisement

दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी: ३१ ऑगस्ट ते २६ ऑक्टोबर २०२६

नोटीस प्रक्रिया व दावे निकाली काढण्याचा कालावधी: ३१ ऑगस्ट ते १० नोव्हेंबर २०२६

मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी: १६ नोव्हेंबर २०२६

नागरिकांनी वाढीव मुदतीचा लाभ घ्यावा: जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

मतदार यादीतील नावात दुरुस्ती, पत्ता बदलणे, नवीन नाव नोंदवणे किंवा अपात्र नावाबाबत काही दावे व हरकती असल्यास, जिल्ह्यातील पात्र नागरिकांनी व मतदारांनी या वाढीव मुदतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

 

Comments

No comments yet.