शाळकरी मुलीवर बलात्कार... अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी... पुणे पोलिसांकडे धाव...

Share:
Last updated: 21-Jan-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २१ जानेवारी - शाळकरी मुलीवर एकाने वेळोवेळी बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे स्थित मुलीने पुण्यातील भुमाता फाऊंडेशनचे कार्यालय गाठल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून, नऱ्हे पोलिसांनी झिरो नंबरने हा गुन्हा अंबड पोलीसांकडे वर्ग केला आहे.

Advertisement

हर्षल मधुकर माळी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. शहरातील सातपूर अंबड लिकरोडवरील विराट संकुल भागात राहणाºया मुलीने याबाबत फिर्याद दिली आहे. अल्पवयीन मुलगी शाळेत असतांना तिची संशयिताशी मैत्री झाली होती. २०२४ मध्ये संशयिताने १६ वर्षीय मुलगी घरात एकटी असल्याची संधी साधून तिला आत्महत्येची धमकी देत बळजबरीने बलात्कार केला. यावेळी त्याने मुलीचे अश्लील फोटो व व्हिडीओ काढला. यानंतर त्याने अश्लिल फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी अत्याचार केला. या जाचास कंटाळून गेल्या वर्षी मुलीने त्याच्याशी बोलणे बंद केले असता त्याने शिवीगाळ व मारहाण केली.

मुलगी सध्या पुण्यात शिक्षण घेत असून तिच्या विरहात त्याने मुलीच्या आई वडिलांशी संपर्क साधत आत्महत्येची आणि अश्लील फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. हा प्रकार मुलीच्या कानी पडताच तिने भूमाता फाऊंडेशनची मदत घेत नऱ्हे पोलीस ठाणे गाठले असून हा गुन्हा अंबड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.

Comments

No comments yet.