मुंबई (प्रतिनिधी), १० ऑक्टोबर २०२६ -
महाराष्ट्र विधानमंडळाजवळ उभारण्यात येत असलेल्या अतिशय आकर्षक आणि अत्याधुनिक ‘मनोरा आमदार निवास’चे बांधकाम वेगाने प्रगतीपथावर आहे. "अ" आणि "ब" या दोन्ही इमारतींचे मनोरे सर्व सुसज्ज सोयी-सुविधांसह आगामी फेब्रुवारी २०२८ पूर्वी आमदारांच्या सेवेत दाखल होणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिली आहे.
शुक्रवारी (ता. ९) विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी प्रत्यक्षात नूतन मनोरा आमदार निवासच्या बांधकामास भेट देऊन पाहणी केली. याप्रसंगी त्यांनी कामाच्या गुणवत्तेचा आढावा घेतला.
बांधकामाची सद्यस्थिती
* "अ" मनोरा: या इमारतीचे सर्व २९ मजले बांधून पूर्ण झाले आहेत.
* "ब" मनोरा: या इमारतीच्या एकूण ४२ मजल्यांपैकी ३४ मजले पूर्ण झाले असून उर्वरित काम वेगाने सुरू आहे.
उपयुक्तता आणि सौंदर्यदृष्टीचा संगम साधण्याचे निर्देश
पाहणी दौऱ्यादरम्यान सभापती प्रा. राम शिंदे यांनी संबंधित यंत्रणा आणि अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की, या वास्तूची निर्मिती करताना उपयुक्तता आणि सौंदर्यदृष्टीचा उत्तम संगम साधला जावा.
तसेच या इमारतीचा आणि येथील सुविधांचा दीर्घकाळ व काळजीपूर्वक वापर व्हावा, यासाठी योग्य ती नियमावली (Rules & Regulations) सुनिश्चित करावी. याआधी देण्यात आलेल्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
अत्याधुनिक सोयी-सुविधांची रेलचेल
या नूतन मनोरा आमदार निवासमध्ये केवळ आमदारच नव्हे, तर त्यांच्या समवेत असणारे त्यांचे स्वीय सहायक (PA), अभ्यागत आणि कार्यालयासाठी एकत्रित व सुसज्ज निवासी कक्षांची रचना करण्यात आली आहे.
याशिवाय आमदारांच्या सोयीसाठी आधुनिक उपहारगृहे (Canteens), प्रशस्त पार्किंग व्यवस्था आणि उच्च दर्जाचे बैठक कक्ष (Meeting Rooms) उपलब्ध असणार आहेत.
या मान्यवरांची होती उपस्थिती:
या पाहणी व आढावा बैठकीरक्षीत महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव-१ श्री. जितेंद्र भोळे, सचिव-४ श्री. शिवदर्शन साठ्ये, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता श्रीमती प्रज्ञा वाळके, कार्यकारी अभियंता श्री. विद्याधर पाटसकर, वास्तुविशारद श्री. अतुल प्रभू, प्रकल्प व्यवस्थापक (लार्सन अँड टुब्रो - L&T) श्री. सतिश राघवन तसेच प्रकल्प सल्लागार ‘फोट्रेस इन्फ्राकॉम’चे श्री. कैलास हे उपस्थित होते.
?s=20