नाशिक, (प्रतिनिधी) १० ऑक्टोबर - राज्यातील टंचाई परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने घोषित केलेल्या २६५ दुष्काळी तालुक्यांमध्ये नाशिक जिल्ह्यातील १० तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर बाधित शेतकरी आणि टंचाईग्रस्त नागरिकांना तातडीने दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने युद्धा पातळीवर अंमलबजावणी सुरू केली आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या सूचनेनुसार आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली महसूल, कृषी व ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत पंचनामे आणि पाणीटंचाई निवारणाची कामे वेगाने राबवली जात आहेत.
८ ऑक्टोबरअखेर पीक पंचनाम्यांची आकडेवारी :
* एकूण लक्ष्यित गावे : १,३३९ गावे (१० तालुके)
* पंचनामे पूर्ण गावे : १,१३२ गावे (८४.५४% प्रगती)
* बाधित पंचनामा क्षेत्र : २,०५०.५४ हजार हेक्टर
* बाधित खातेदार शेतकरी : २,५३,७००
खरीप हंगाम २०२६ मधील 'ट्रिगर-१' अंतर्गत समाविष्ट या तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष शेतावर जाऊन अचूक आकडेवारी नोंदवण्याचे काम सुरू आहे. नांदगाव (१००/१००), इगतपुरी (१२६/१२६) आणि सिन्नर (१३१/१३१) या तीन तालुक्यांत १०० टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित बागलाण, सुरगाणा, पेठ, कळवण, देवळा, येवला व मालेगाव तालुक्यांतील काम अंतिम टप्प्यात आहे.
तालुकानिहाय पंचनामा प्रगती अहवाल
* नांदगाव : १००/१०० (१००%)
* इगतपुरी : १२६/१२६ (१००%)
* सिन्नर : १३१/१३१ (१००%)
* बागलाण : १६५/१७२
* सुरगाणा : १८१/१९१
* पेठ : १३२/१४६
* कळवण : १२४/१५२
* देवळा : ३८/४६
* येवला : ६०/१२४
* मालेगाव : ७५/१५१
पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य
दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याला शासनाने प्रथम प्राधान्य दिले आहे. ५ ऑक्टोबरच्या अहवालानुसार जिल्ह्यातील २ तालुक्यांतील ५५ गाव-वाड्यांना १५ टँकरच्या ३० फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, याचा ३७,७१४ नागरिकांना थेट लाभ होत आहे:
१. मालेगाव तालुका : ६ गावे + १४ वाड्या (एकूण २० ठिकाणे) | ६ टँकर (१२ फेऱ्या) | १३,१४० नागरिक लाभार्थी
२. येवला तालुका : १२ गावे + २३ वाड्या (एकूण ३५ ठिकाणे) | ९ टँकर (१८ फेऱ्या) | २४,५७४ नागरिक लाभार्थी
"शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची वस्तुनिष्ठ व अचूक नोंद घेऊन निर्धारित वेळेत पंचनामे पूर्ण करावयाचे आहेत. महसूल व कृषी विभागाने समन्वयाने काम करावे. तसेच पाणीटंचाईग्रस्त भागांत नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून आवश्यकतेनुसार टँकरच्या फेऱ्यांचे नियोजन तत्परतेने केले जात आहे."
— गिरीश महाजन, पालकमंत्री, नाशिक